आजचे राशीभविष्य – ‘या’ राशीच्या व्यक्तींसाठी आज ‘खरेदी’चा योग, तर ‘या’ राशीच्या व्यक्तींना मिळणार ‘पदोन्नती’ची संधी

0

मेष रास –
नव्या योजनांच्या शुभारंभासाठी आजचा दिवस उत्तम असेल. आई वडिलांच्या इच्छेविरोधात कोणतेही काम करु नका. नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे.

वृषभ रास –
धार्मिक आणि मंगलकार्य पार पडण्याचा योग आहे. सरकारी अधिकाऱ्यांबरोबर चांगला व्यवहार करा. पत्नीशी वाद होईल, परंतू पत्नीच्या आरोग्याची काळजी घ्या.

कन्या रास –
धनप्रप्तीची शक्यता आहे. अत्याधिक जबाबदारीमुळे मन विचलित राहिलं. मुलांची काळजी लागेल. संध्याकाळची वेळ अनुकूल असेल.

सिंह रास –
तुमच्या कार्याचा गर्व कराल तर बदनामी होऊ शकते. व्यवसायासाठी प्रवास करावा लागू शकतो. दिवसभर तणाव जाणवेल.

मिथुन रास –
नियोजन बदलावे लागेल. नात्यात वाद होऊ शकतात. पैशामुळे समस्या उद्भवू शकते. व्यसन केल्यास नुकसान होईल.

कर्क रास –
तुमचे व्यक्तित्व उजळून येईल. तुमच्या लोकांमुळे तुम्हाला समस्या येतील परंतू त्यांची साथ सोडून नका. रागावर नियंत्रण ठेवा.

तुळ रास –
सकाळी आनंदाची बातमी मिळेल. कुटूंबातील वातावरण आनंदी असेल. धार्मिक कार्यक्रमात भाग घ्यालं. प्रवास करताना दुर्घटनेची शक्यता आहे, काळजी घ्या.

धनू रास –
लक्ष्मीची कृपा असेल. आनंदामुळे नातेवाइकांना विसरुन जाऊ नका. नोकरी करणाऱ्यांना पदोन्नती मिळेल. नव्या खरेदीचा योग आहे.

मकर रास –
काही लोक तुमच्या कामात अडथळे आणतील त्यामुळे नुकसान होईल. अनेक दिवसांपासून असलेल्या समस्या दूर होतील. संध्याकाळी घरात राहणे फायदेशीर ठरेल.

कुंभ रास –
आजाराने समस्या उद्भवतील. व्यवसायात प्रगती होईल. तुमचे मित्र तुमची बदनामी करतील. आरोग्याची काळजी घ्या.

वृश्चिक रास –
नवे दुकान किंवा घर खरेदी करण्यासाठी दिवस अनुकूल आहे, प्रसन्नता मिळेल. आनोखी व्यक्तीमुळे नुकसान होऊ शकते.

मीन रास –
बेजबाबदार राहू नका, नुकसान होईल. पती पत्नीत वाद होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी लाभकारक ठरेल.

शब्दांकन – वैभव गाटे.

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7410110048
7410110049
www.rhsonipoojabhandar.com
www.astrologerrhsoni.com

Leave A Reply

Your email address will not be published.