वेळेचे नियोजन आणि नियोजनाप्रमाणे काम केल्यास यश मिळतेच – खासदार गिरीश बापट.

उद्यम सहकारी बॅंक "अ' दर्जा - बॅंक प्रगतीपथावर...संदीप खर्डेकर.

0

एन पी न्यूज 24 – आपल्याकडे उपलब्ध वेळेचे योग्य नियोजन केले आणि त्या नियोजनाप्रमाणे काम केल्यास हमखास यश मिळतेच असे प्रतिपादन खासदार गिरीश बापट यांनी केले.उद्यम सहकारी बॅंकेच्या सर्वसाधारण सभेप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.सहकार क्षेत्रात सध्या चिंतेचे वातावरण आहे मात्र उद्यम विकास सहकारी बॅंकेने या काळात लक्षणीय प्रगती केली असून संचालक मंडळाच्या प्रामाणिक कारभारामुळेच हे शक्य झाले असे ही त्या म्हणाले.

आज सर्वसाधारण सभेच्या निमित्ताने बॅंकेने आपल्या सदस्यांच्या कुटूंबातील गुणवंत विद्यार्थ्यांचा माझ्या हस्ते सत्कार घडवून आणला यातूनच बॅंकेच्या संचालक मंडळाचे ठेवीदार ,खातेधारक,सदस्य यांच्याशी असलेल्या स्नेहाची कल्पना येते.सांगली कोल्हापूर येथील पूरस्थिती असो किंवा जिल्ह्यातील अवर्षण उद्यम बॅंकेने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून मुख्यमंत्री निधीस एक दिवसाचा पगार  किंवा प्रत्यक्ष बाधितांना मदत केली हे कार्य स्पृहणीय असल्याचे ही ते म्हणाले.गेलेली वेळ पुन्हा येत नाही त्यामुळे विद्यार्थ्यांनी वेळेचा सदुपयोग केला पाहिजे आणि सतत शिकत राहिले पाहिजे असे ही ते म्हणाले.

सहकार क्षेत्र अत्यंत कठीण काळातून मार्गक्रमण करत आहे मात्र केवळ सचोटीने व्यवसाय करुन उद्यम सहकारी बॅंकेने ग्राहकांचा विश्वास तर संपादन केला आहेच पण त्याच बरोबर ” अ ” टिकविण्यात ही बॅंकेने यश मिळविल्याचे बॅंकेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर म्हणाले.ह्या यशात बॅंकेच्या कर्मचाऱ्यांचा मोलाचा वाटा असल्याचे सांगून ज्याप्रमाणे मोठ्या मॉल मधे जाणारा ग्राहक तेथील लखलखाटाला भुलुन तेथे जातो पण नंतर फिरुन तो पुन्हा गल्लीतील दुकानदाराकडेच परततो तीच स्थिती आज सहकारी बॅंकेची असून तेथे ग्राहकाला मिळणाऱ्या आपुलकीच्या व्यवहारामुळे ग्राहकास बॅंकांचा आधार वाटतो असे ही ते म्हणाले.माझ्या अध्यक्षपदाच्या कारकीर्दीत बॅंकेने ३०% व्यवसाय वृद्धी केली असून २०० कोटीचा व्यवसाय केल्याचे संदीप खर्डेकर म्हणाले.

यावेळी बॅंकेला सातत्याने मार्गदर्शन करणारे गिरीशभाउ बापट यांची खासदारपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे बॅंकेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर व उपाध्यक्ष लीनाताई अनास्कर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बॅंकेचे तज्ञ संचालक दिनेश गांधी ,संचालक महेश लडकत , दिलीप उंबरकर ,शिरीष कुलकर्णी,मनोज नायर ,पांडुरंग तथा पी के कुलकर्णी,निरंजन फडके,सीताराम खाडे ,राजेंद्र परदेशी,गोकुळ शेलार ,महेंद्र काळे ,इ उपस्थित होते. बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक देशपांडे यांनी सूत्रसंचालन,बॅंकेचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी प्रास्ताविक व स्वागत तर दिनेश गांधी यांनी आभार प्रदर्शन केले.

visit : http://npnews24.com

Leave A Reply

Your email address will not be published.