आजचे राशीभविष्य – ‘या’ राशीवर असणार ‘लक्ष्मी’ नाराज, ‘या’ राशीला मिळणार ‘व्यवसायात’ यश

0

एन पी न्यूज २४
मेष रास –
सरकारी, खासगी कामात अडचणी येतील. मुलाखतीत यश मिळेल. मेहनत करणाऱ्यांना त्यांच्या कष्टाचे आवश्यक तसे फळ मिळणार नाही.

वृषभ रास –
प्रेमसंबंधित वाद होण्याची शक्यता आहे. वाडवडिलांच्या संपत्तीत घराचा लाभ तुम्हाला मिळू शकतो. कुटूंबियांना उगाच विरोध करुन नका, नुकसान होईल.

कन्या रास –
आई वडिलांचा आदर करा, पत्नीशी वाद घालू नका. मुलांकडे लक्ष द्या. व्यवसायात यश मिळेल. नोकरीत परिवर्तन होण्याची शक्यता आहे.

सिंह रास –
तुमच्या हाताखाली काम करण्याऱ्या व्यक्तीकडून तुम्हाला त्रास होऊ शकतो. धार्मिक प्रवासाचे आयोजन होऊ शकते.

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7410110048
7410110049
www.rhsonipoojabhandar.com
www.astrologerrhsoni.com

मिथुन रास –
व्यवसायात लक्ष द्या, नुकसान होऊ शकते. कर्मचाऱ्यांशी प्रेमाने व्यवहार करा. पोलिस आणि न्यायालयासंबंधित अडचणी येऊ शकतात.

कर्क रास –
मुलांना विरोध करणे तुमच्यासाठी नुकसानकारक ठरु शकते. जबरदस्ती कोणावर काहीही नियम लादू नका. आर्थिक परिस्थिती मजबूत असेल, खर्च अत्याधिक होईल.

तुळ रास –
सकाळपासून परिस्थिती वाईट असेल. शिक्षणात अडथळे येऊ शकतात. व्यवसायाच्या, नोकरीच्या ठिकाणी वाद होऊ शकतात. प्रवासासाठी नियोजन करावे.

धनू रास –
लोकांना सल्ला देऊ नका, लोक नाराज होतील. पदोन्नतीची शक्यता आहे. कुटूंबात शांतता राखा, सर्व काही वेळेनुसार चांगले होईल.

मकर रास –
स्पर्धेत भाग घेण्याची संधी चालून येईल. यश देखील मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. स्वभावात आवश्यक बदल करा, अन्यथा लोक तुमच्यापासून दूर होतील.

कुंभ रास –
अपरिचित व्यक्तीशी मैत्री नुकसानकारक ठरु शकते. नव्या व्यवसायाची सुरुवात करणार असाल तर थांबा. कर्ज घेण्याची आवश्यकता येऊ शकते.

वृश्चिक रास –
व्यवसायाचा विस्तार होईल. मेहनत अधिक कराल परंतू मानसिक ताण येईल. रुग्णालयात जाण्याची वेळ येऊ शकते. उधार दिलेले पैसे परत मिळतील.

मीन रास –
हिंमतीने काम करा. कामात अडचणी येण्याची शक्यता आहे. समाजात मान सन्मान वाढेल. मित्रांचे सहकार्य लाभले.

शब्दांकन – वैभव गाटे.

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7410110048
7410110049
www.rhsonipoojabhandar.com
www.astrologerrhsoni.com

Leave A Reply

Your email address will not be published.