आजचे राशीभविष्य – ‘या’ राशीच्या ‘स्त्रीयांना’ मानसिक ‘ताण’ येण्याची शक्यता, घ्यावी लागणार स्वत:ची ‘काळजी’

 एन पी न्यूज २४

मेष रास –
व्यवसायास नव्याने सुरुवात करणार असाल तर आजचा दिवस लाभकारक ठरेल. वेळ अनुकूल असल्याने अनेक कामे पार पडतील.

वृषभ रास –
आर्थिक परिस्थिती मजबूत असेल. अचानक एखादे मंगलकार्य पार पडेल. त्यामुळे आनंदाचे वातावरण असेल. मुलांमुळे मात्र काळजी लागून राहिलं.

कन्या रास –
पती पत्नीत वाद होण्याची शक्यता आहे. स्त्रीमध्ये जबाबदारीमुळे अत्याधिक चिंता असेल. लोकांच्या वागण्याने मन दुखी होईल. पोटासंबंधित आजार उद्भवतील.

सिंह रास –
दुपारनंतरचा दिवस चांगला आहे. तुमच्या लोकांकडून तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. समस्यांना घाबरुन जाण्याची गरज नाही.

मिथुन रास –
आरोग्याची काळजी घ्या. अधिकाऱ्यांच्या दूर्लक्षाचा परिणाम छोट्या कर्मचाऱ्यांवर होईल. अडून राहिलेली कामे पूर्ण होतील. कुटूंबाच्या जबाबदारीचे ओझे तुमच्या एकट्यावर येईल.

कर्क रास –
व्यवसायाबाबत चिंता राहिलं. अत्याधिक खर्च होऊ शकतो. दूर प्रवासाचा योग आहे. नोकरी करणाऱ्यांचा मान सन्मान वाढेल.

तुळ रास –
व्यवसायात स्थिती सुधारेल. आज सकाळपासूनच दिवस खराब जाईल. कुटूंबात वाद होण्याची शक्यता आहे. नोकरीच्या स्थानात बदल होण्याची शक्यता आहे.

धनू रास –
जोडीदाराबरोबर तणाव असेल, भाग्य अनुकूल असेल. तुमच्या कामात लक्ष द्या. व्यवसायाची सुरुवात चांगली होईल. कामाची जबाबदारी मुलांवर सोपवा.

मकर रास –
व्यवसायाबद्दल मन चिंतित राहिलं. कौटूंबिक वाद होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या.

कुंभ रास –
कर्जदारांना समस्या उद्भवू शकतात. व्यवसायात वाढ करण्यासाठी दूर प्रवास करावा लागू शकतो. वेळ अनुकूल आहे. मुलांकडून आनंद मिळेल.

वृश्चिक रास –
आई वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या, खोटे बोलून कोणतेही काम करु नका. न्यायालयीन कामात यश मिळेल. जून्या वादांना वाढवू नका.

मीन रास –
राजकीय क्षेत्रात चांगले काम झाल्याने मन प्रसन्न असेल. चूकांकडे जास्त लक्ष देऊ नका, काही मोठी कामे पार पडतील. कोणालाही आश्वासन देऊ नका.

शब्दांकन – वैभव गाटे.

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7410110048
7410110049
www.rhsonipoojabhandar.com
www.astrologerrhsoni.com

Comments are closed.