आजचे राशीभविष्य – ‘या’ दोन राशींच्या जीवनात ‘विवाहाचा’ योग, काय आहे तुमच्या राशीत, जाणून घ्या

1

एन पी न्यूज २४
मेष रास –
तुमच्या कामाची चिंता करा, दुसऱ्यावर वेळ वाळ्या घालवू नका. उत्पनात वाढ होईल. नोकरी करणाऱ्यांना थोडी मेहनत घ्यावी लागेल.

वृषभ रास –
पांढरे वस्त्र तुमच्यासाठी शुभ असणार आहे. नव्या लोकांशी भेटी गाठी होतील. फायदा होईल. कुटूंबातील समस्या दूर होतील. घरातील सदस्य तुमच्यावर खूश असतील.

कन्या रास –
लोक तुमचा फायदा घेऊ शकतात. राजकीय क्षेत्रात मान सन्मान वाढेल. परदेशात व्यवसायाची संधी आहे.

सिंह रास –
आळस झटका. वडीलांशी वाद घालू नका, पैशांच्या व्यवहारात फसवणूक होऊ शकते. आरोग्याची काळजी घ्या.

मिथुन रास –
मन विचलित असेल. व्यवसायात फायदा होईल, व्यवसायात लक्ष द्या. वरिष्ठांशी संबंध चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा. नव्या कार्यासाठी उत्साह वाढेल.

कर्क रास –
कुटूंबात धार्मिक कार्य पार पडल्याने आनंदाचे वातावरण असेल. मित्रांकडून समस्या उद्भवू शकते. नोकरीत पदोन्नतीचा योग आहे.

तुळ रास –
अनेक दिवसांपासून सुरु असलेले खटले तुमच्या बाजूने लागतील. समाजात मानसन्मान वाढेल. विवाहाचा योग आहे. मंगलकार्याचा योग आहे.

धनु रास –
लोकांच्या चूकीच्या वर्तनाने तुम्ही दुखी व्हाल. तुमच्या भावनांचा लोक विचार करणार नाहीत. परंतू तुमच्या कामात लक्ष द्या. वरिष्ठांशी चांगले संबंध ठेवा.

मकर रास –
नकळत झालेल्या चूकांमुळे अडचणीत याल. आजचा दिवस उत्तम असणार आहे. कुटूंबातील कोणाचे मन दुखावू नका. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष द्या.

कुंभ रास –
व्यवसायात बदल करणे आवश्यक आहे. काही लोकांमुळे समस्या उद्भवेल.

वृश्चिक रास –
जुने वाहन विकून नवे वाहन घेण्याची इच्छा असेल. कर्ज घ्यावे लागू शकते. सोने चांदी खरेदीचा योग आहे.

मीन रास –
अनेक दिवसांपासून अडून राहिलेला विवाहाचा प्रस्ताव मार्गी लागेल. सरकारी कामात अडचणी येतील.

शब्दांकन – वैभव गाटे.

ज्योतिषी आर. एच. सोनी
फोन – 7410110048
7410110049
www.rhsonipoojabhandar.com
www.astrologerrhsoni.com

 

1 Comment
  1. cellar says

    Askіng queѕtions are actuaⅼly fastіdious thing if you are not
    understanding anything fully, but thiѕ piece of writing offers fastidious ᥙnderstanding even.

Leave A Reply

Your email address will not be published.