Pune Mundhwa Police | पुणे मनपा सफाई कामगाराचा प्रामाणिकपणा! सापडलेली अंगठी पोलिसांकडे जमा करणाऱ्या सफाई कामगाराचा मुंढवा पोलिसांकडून सत्कार

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Mundhwa Police | मुंढवागाव परिसरात झाडू मारुन कचारा गोळा करत असताना पुणे मनपाच्या सफाई कामगाराला (Pune PMC Cleaning Workers) कचऱ्यामध्ये एक सोन्याची अंगठी सापडली. त्याने कोणताही लोभ न करता ती अंगठी मुंढवा पोलीस ठाण्यात (Mundhwa Police Station) आणून जमा केली. सफाई कामगाराने दाखवलेल्या प्रामाणिकपणा बद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी (Senior PI Mahesh Bolkotgi) यांनी सफाई कामगाराचा सत्कार केला आहे. प्रदीप सुरेश गायकवाड (वय-42 रा. आनंद निवांद, मुंढवा) असे या सफाई कामगाराचे नाव आहे.

प्रदीप गायकवाड हे पुणे महानगरपालिकेत सफाई कामगार आहेत. मुंढवागाव भागात झाडू मारुन करचा गोळा करताना त्यांना कचऱ्यामध्ये 30 हजार रुपये किमतीची 5 ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी सापडली. त्यांनी ती अंगठी मुंढवा पोलीस ठाण्यात आणून जमा केली. ज्या ठिकाणी अंगठी सापडली त्याठिकाणी जावून पोलिसांनी चौकशी केली. त्यावेळी अमोल बाळकृष्ण घुमे (वय-60 रा. दत्तमंदिर चौक, मुंढवा गाव) यांची असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी खातरजमा करुन ती अंगठी मुळ मालकाला परत केली. हरवलेली सोन्याची अंगठी परत मिळाल्याने अमोल घुमे व इतर स्थानिक नागरिकांनी सफाई कामगार प्रदीप गायकवाड व पोलिसांचे कौतुक केले.

सफाई कामगार प्रदीप गायकवाड यांनी त्यांची हलाकीची व गरीब परिस्थिती असताना देखील कोणताही लोभ न
बाळगता सोन्याची अंगठी पोलीस ठाण्यात जमा केली. तसेच मुळ मालकाला अंगठी परत करुन माणुसकीचे उत्तम
उदाहरण जनतेसमोर ठेवले आहे. त्यांच्या या कमाची दखल घेऊन पोलिसांनी त्यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पोलीस सह आयुक्त प्रविण पवार, अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशिक
विभाग मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त आर. राजा, सहायक पोलीस आयुक्त अश्विनी राख
यांच्या सुचनेप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोटगी, पोलीस उपनिरीक्षक अर्जुन नाईकवाडे,
पोलीस अंमलदार सचिन अडसुळ व इतर कर्मचाऱ्यांनी केली.

Pune Police MCOCA Action | माथाडी बोर्डाचे नेते असल्याचे सांगून खंडणी मागणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’

Pune Minor Girl Rape Case | मारहाण करुन अल्पवयीन मुलीवर बलात्कार, चंदननगर परिसरातील घटना

Manohar Joshi Passed Away | माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांचे निधन

Pune Crime News | दिघी येथील लॉजमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोन महिलांची सुटका; एकाला अटक (Video)

Pune Crime News | पोलिसांच्या तावडीतून सायबर गुन्ह्यातील महिला आरोपीचे पलायन, तर येरवडा पोलीस स्टेशन समोरून आरोपीने ठोकली धूम

Leave A Reply

Your email address will not be published.