Cheating Fraud Case Pune | पुणे : 20 लाखांच्या फसवणूक प्रकरणी 3 वकील व पोलीस कर्मचाऱ्यासह सात जणांवर FIR

0

पुणे : – Cheating Fraud Case Pune | आम्हाला कोट्यवधी रुपये मिळणार असून तुम्हाला बक्षीस पत्र तयार करु देतो असे सांगून एका महिलेची 20 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तीन वकील व पोलीस कर्मचाऱ्यासह सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार जुलै 2016 ते एप्रिल 2024 या कालावधीत शिवाजीनगर कोर्ट (Shivaji Nagar Court Pune) परिसरात व इतर ठिकाणी घडला आहे.

याबाबत मोनिका मंदार खळदकर (वय-40 रा. दांगट पाटीलनगर, शिवणे, पुणे) यांनी शुक्रवारी (दि.26) शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivaji Nagar Police Station Pune) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन मनीषा करडे, मंगला राठोड, सुभाष उत्तेश्वर अवघडे, ॲड. तुकाराम कटुले, ॲड. अनिल मिसाळ, ॲड. अनंत संकुडे व अनोळखी पोलीस कर्मचाऱ्यावर आयपीसी 420, 406, 467, 468, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक अजित बडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा ब्युटी पार्लरचा व्यवसाय आहे. आरोपींनी संगनमत करुन आम्हाला कोट्यवधी रुपये मिळणार आहेत. टॅक्स वाचवण्यासाठी तुम्हाला बक्षीस पत्र तयार करुन देतो असे खोटे सांगितले. बक्षीस पत्र तयार करण्याच्या बहाण्याने व वेगवेगळी कारणे सांगून आरोपींनी फिर्यादी यांच्याकडून वेळोवेळी पैशांची मागणी केली. त्यानुसार फिर्यादी यांनी आरोपींना 20 लाख रुपये दिले.

आरोपींनी खोटे कागदपत्रे बनवुन ते खरे असल्याचे भासवले. खोटे कागदपत्र तयार करुन ते कोर्टाचे रेकॉर्ड आहे भासवून आरबीआय (रिझर्व बँक) चे खोटे सर्टिफिकेट तयार केले. त्यासाठी खोटे रबरी शिक्के तयार केले. आरोपींनी सर्टिफिकेटवर अशोक स्तंभ असलेला शिक्का मारला. मात्र, हे सर्टीफिकेट बनावट असल्याचे लक्षात आल्यानंतर मोनिका खळदकर यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली.

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींमध्ये पोलीस कर्मचारी असल्याचे महिलेने सांगितले आहे. मात्र, तो खरा पोलीस कर्मचारी होता का हे अद्याप समजू शकले नाही. आरोपींनी एखाद्या व्यक्तीला पोलिसांचा गणवेश घालून फिर्य़ादी यांच्यासमोर उभे केले आहे का याचा तपास पोलीस करत असल्याचे तपास अधिकारी पीएसआय बडे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.