Pune Crime News | दिघी येथील लॉजमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोन महिलांची सुटका; एकाला अटक

0

पिंपरी : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – दिघी येथील वडमुखवाडी परिसरातील लॉजमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायाचा (Pune Crime News) पिंपरी चिंचवड पोलिसांच्या (Pimpri Police) अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन महिलांची सुटका करुन लॉज मालकावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. ही कारवाई मंगळवारी (दि.20) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास वडमुखवाडी परिसरातील खडीमशीन रोडवरील सनशाईन लॉज येथे केली आहे.(Pune Crime News)

नितीन रावसाहेब कोकरे (वय-28 रा. विश्रांतवाडी, पुणे) याच्यावर आयपीसी 370 सह अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. याबाबत पोलीस हवालदार मारुती महादेव करचुंडे (वय-38) यांनी दिघी पोलीस ठाण्यात (Dighi Police Station) फिर्याद दिली आहे.

वडमुखवाडी येथील सनशाईन लॉजमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी ग्राहक पाठवून खात्री करुन घेतली. त्यानंतर छापा टाकून दोन महिलांची सुटका केली. आरोपीने पीडित महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्याच्या लॉजमध्ये ठेवले होते. आरोपी त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेत होता. यातून मिळणाऱ्या पैशातून स्वत:ची उपजिवीका भागवत असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पुढील तपास महिला सहायक पोलीस फौजदार पारधी करीत आहेत.

Pune Wagholi Crime | ‘हा एरिया माझा आहे’, घर शोधणाऱ्या महिलेला मारहाण, वाघोली परिसरातील प्रकार

Pune Pimpri Police News | ‘मॅट’ काय देणार निर्णय ! पुणे, पिंपरीतील पोलिसांचे लागले लक्ष; पोलीस दलातील बदल्यांमध्ये निवडणुक आयोगाचे निर्देश धाब्यावर?

Pune Sadashiv Peth Crime | जिममधून 73 लाखांच्या किमती सामानाची चोरी, सदाशिव पेठेतील घटना

Leave A Reply

Your email address will not be published.