Pune Crime News | पोलिसांच्या तावडीतून सायबर गुन्ह्यातील महिला आरोपीचे पलायन, तर येरवडा पोलीस स्टेशन समोरून आरोपीने ठोकली धूम

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | फसवणूक प्रकरणात (Cheating Fraud Case) हरियाणा येथून अटक करुन पुण्यात आणले जात असताना एका महिला आरोपीने रेल्वेतून पलायन केल्याची घटना उघडकीस आली आहे. राजस्थानातील कोटा शहराजवळ नागदा स्थानकात सिग्नल लागल्यानंतर महिला आरोपीने पोलिसांना (Pune Police) गुंगारा देऊन पलायन केले. (Pune Crime News)

सादिया सिद्दीकी (वय-35) असे पळून गेलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे. सादिया हिच्याविरुद्ध ऑनलाईन फसवणूक प्रकरणी पुणे सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास करून तिचा शोध घेतला. सादीया हरियाणात असल्याचे समजल्यानंतर पोलिसांच्या पथकाने त्याठिकाणी जाऊन तिला अटक केली. न्यायालयाकडून प्रवासी कोठडी मिळवून सादियाला घेऊन सायबर पोलीस ठाण्याचे पथक रेल्वेने पुण्याकडे येत होते. राजस्थानातील कोटा परिसरातील नागदा स्थानकाजवळ रेल्वे सिग्नल साठी थांबली होती. त्यावेळी सादियाने पोलिसांना गुंगारा देऊन पळून गेली.

येरवडा पोलीस स्टेशन समोरुन आरोपी पळाला

येरवडा : येरवडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, आरोपीने येरवडा पोलीस ठाण्याच्या प्रवेश द्वाराजवळून पळ काढला. हा प्रकार बुधवारी (दि.21) दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास येरवडा पोलीस स्टेशन येथे घडला. सिद्धार्थ संजय भालेराव (वय-21 रा. मु.पो. इनामगाव ता. शिरुर) असे पळून गेलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत पोलीस हवालदार गोविंद पंढरीनाथ जायभाये यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, आरोपी सिद्धार्थ भालेराव याच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. दाखल गुन्ह्यात त्याला दोषी ठरविण्यात आले होते. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. तो फिर्यादी पोलीस हवालदार गोविंद जायभाये यांच्या ताब्यात होता. बुधवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास त्याला पोलीस ठाण्यात नेत असताना त्याने पोलीस स्टेशनच्या प्रवेश द्वारावरुन फिर्य़ादी यांना गुंगारा देवून पळून गेला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील करीत आहेत.

Pune Wagholi Crime | ‘हा एरिया माझा आहे’, घर शोधणाऱ्या महिलेला मारहाण, वाघोली परिसरातील प्रकार

Pune Pimpri Police News | ‘मॅट’ काय देणार निर्णय ! पुणे, पिंपरीतील पोलिसांचे लागले लक्ष; पोलीस दलातील बदल्यांमध्ये निवडणुक आयोगाचे निर्देश धाब्यावर?

Pune Sadashiv Peth Crime | जिममधून 73 लाखांच्या किमती सामानाची चोरी, सदाशिव पेठेतील घटना

Leave A Reply

Your email address will not be published.