Taljai Vasahat Pune Crime | पुणे : ‘हा आपला इलाका, मी इथला भाई आहे’ स्वयंघोषित भाईकडून तरुणावर कोयत्याने वार

0

पुणे : – Taljai Vasahat Pune Crime | मी इथला भाई आहे असे म्हणत एका सराईत गुन्हेगाराने (Criminal On Police Records) तरुणावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी (Attempt To Murder) केल्याची घटना पुण्यातील तळजाई वसाहत परिसरात घडली आहे. याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी (Sahakar Nagar Police) सराईत गुन्हेगारावर आर्म अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. ही घटना बुधवारी (दि.24) रात्री पावणे अकराच्या सुमारास तळजाई वसाहत येथील जय अंबे देवी मंदिराजवळ घडली.

याबाबत निलेश गुलाब आवळे (वय-23 रा. खंडाळे चौक, तळजाई वसाहत, पुणे) याने सहकारनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन साहिल उर्फ भावड्या कुचेकर (रा. तळजाई वसाहत, पुणे) याच्यावर आयपीसी 324 सह आर्म अॅक्ट, महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी साहील कुचेकर हा पोलीस रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर सहकारनगर पोलीस ठाण्यात चार गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी निलेश आवळे त्याच्या घरी जात होता. त्यावेळी त्याच्या ओळखीचा आरोपी साहील याने अडवले. तु इकडे काय करतो, तु इकडे फिरायचे नाही, हा माझा इलाका आहे. मी इथला भाई आहे, असे म्हणत निलेश याला दमदाटी केली. निलेश याने यापुढे मी इकडे येणार नाही असे म्हणून तेथून जाऊ लागला. त्यावेळी आरोपीने अचानक त्याच्या जवळ असलेल्या कोयत्याने निलेश याच्यावर वार करण्यास सुरुवात केली. आरोपीने निलेशच्या हातावर, पायावर कोयत्याने वार केले. घाबरलेल्या निलेश याने जीव वाचवण्यासाठी तेथून पळून गेला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.