Rape Case Pune | पुणे : विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार करुन खासगी फोटो केले व्हायरल, दोघांवर FIR

0

पुणे : – Rape Case Pune | विवाहित महिलेसोबत मैत्री करुन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवून जातीवाचक शिवीगाळ केली. तसेच तिचे खासगी फोटो व्हायरल (Nude Photo) केले. याप्रकरणी एका महिलेसह दोघांवर विमानतळ पोलीस ठाण्यात (Viman Nagar Police Station) गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार डिसेंबर 2023 ते एप्रिल 2024 या कालावधीत विमाननगर आणि धानोरी येथे घडला आहे.

याबाबत 30 वर्षीय महिलेने शुक्रवारी (दि.26) विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार फकीरा उर्फ करण रामदत्त शर्मा
Fakira alias Karan Ramdutt Sharma (वय-35 रा. धानोरी) व 30 वर्षीय महिले विरुद्ध आयपीसी 376, 376/2/एन, 376/जे, 323, 352, 504, 506, 34 सह अॅट्रॉसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी आणि आरोपी यांची डिसेंबर 2023 मध्ये ओळख झाली. आरोपीने महिलेसोबत मैत्री करुन तिच्यावर विमाननगर आणि धानोरी येथे जबरदस्तीने वेळोवेळी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडित महिलेने आरोपीला विरोध केला असता जातीवाचक शिवीगाळ केली. तर आरोपी महिलेने धमकी देऊन तिचे खासगी फोटो ओळखीच्या लोकांच्या मोबाईलवर पाठवून फिर्य़ादी यांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.