Pune Lonikand Crime | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर बलात्कार

0

पुणे : – Pune Lonikand Crime | पुणे शहरात दिवसेंदिवस महिला अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. प्रेमाच्या जाळ्यात ओढून तसेच लग्नाचे आमिष दाखवून (Lure Of Marriage) महिला व तरुणींवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault) केल्या प्रकरणीच्या तक्रारी वाढल्या आहेत. सांगवी (Sangvi) येथे राहणाऱ्या 30 वर्षाच्या तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार (Pune Rape Case) केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी उस्मानाबाद (Osmanabad) येथे राहणाऱ्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत 30 वर्षीय तरुणीने लोणीकंद पोलीस ठाण्यात (Lonikand Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन समाधान मोहन येडके Samadhan Mohan Yedke (वय-33 सध्या रा. कात्रज मुळ रा. गणेश नगर ता. जि. उस्मानाबाद) याच्यावर आयपीसी 376, 323, 504 नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार जून 2023 ते जानेवारी 2024 या कालावधीत वाघोली आणि सांगवी परिसरात घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडित तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तिला वाघोली आणि सांगवी येथील लॉजवर नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. मुलीने लग्नाबाबत विचारणा केली असता तिला मारहाण करुन धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

तरुणीचे आक्षेपार्ह फोटो केले व्हायरल

लोणीकंद : तरुणीचे आक्षेपार्ह फोटो (Offensive Photos) सोशल मीडियावर व्हायरल (Social Media) करुन तिची बदनामी करुन विनयभंग (Molestation Case) केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित 20 वर्षाच्या तरुणीने लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे. यावरुन शुभम पगारे (वय-22 रा. पंढरपुर रोड, छत्रपती संभाजीनगर) याच्यावर आयपीसी 354, 506 सह आयटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 1 एप्रिल ते 4 एप्रिल या कालावधीत घडला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्य़ादी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. आरोपीने तरुणीसोबत असलेले आक्षेपार्ह फोटो व्हॉट्सअॅप तसेच इंन्स्टाग्रामवर व्हायरल करुन तरुणीचा विनयभंग केला. आरोपी शुभम याने तरुणीचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर व्हायरल करुन बदनामी केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) सीमा ढाकणे (PI Seema Dhakne) करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.