Pune Cop Suspended | पुणे : पोलीस कर्मचारी तडकाफडकी निलंबित, जाणून घ्या प्रकरण

Police Suspended

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Cop Suspended | बालविवाह केल्या प्रकरणी समर्थ पोलीस ठाण्यातील (Samarth Police Station) पोलीस कर्मचाऱ्याला तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे. पोलीस शिपाई गणेश शिवाजी चेमटे (Police Officer Ganesh Shivaji Chemte) असे निलंबित (PUne Police Suspended) करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. निलंबनाचे आदेश पोलीस उपायुक्त परिमंडळ -1 संदीप सिंह गिल्ल यांनी शुक्रवारी (दि.23) काढले आहेत.

पोलीस कर्मचारी गणेश शिवाजी चेमटे यांचा दोन वर्षापूर्वी एका अल्पवयीन मुलीसोबत विवाह झाला होता. मुलगी अल्पवयीन असल्याचे माहित असताना देखील तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. यातून मुलगी गरोदर राहुन तिने एका बाळाला जन्म दिला. याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात गणेश चिमटे यांच्यासह इतरांवर बालविवाह प्रतिबंध कायद्यांतर्गत व पोक्सो कायद्यानुसार गुरुवारी (दि.22) गुन्हा दाखल केला आहे. हा गंभीर स्वरुपाचा गुन्हा असून जनमानसात पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणारे वर्तन केल्याने गणेश चेमटे यांना निलंबित करण्यात आले आहे.

निलंबन काळात गणेश चेमटे यांना कोणत्याही प्रकारची खजगी नोकरी किंवा व्यवसाय करता येणार नाही.
याबाबतचे प्रमाणपत्र देऊन निर्वाह भत्त्याची रक्कम स्वीकारावी लागेल, असे आदेशात नमूद केले आहे.
तसेच निलंबन काळात मुख्यालय सोडून जायचे असेल तर पोलीस उप आयुक्त मुख्यालय यांची परवानगी घ्यावी लागेल. तसेच निलंबनाच्या कालावधीत दररोज राखीव पोलीस निरीक्षक, पोलीस मुख्यालय पुणे शहर यांच्याकडे हजेरी द्यावी लागेल, असे आदेशात नमूद केले आहे.

Pune Mundhwa Police | पुणे मनपा सफाई कामगाराचा प्रामाणिकपणा! सापडलेली अंगठी पोलिसांकडे जमा करणाऱ्या सफाई कामगाराचा मुंढवा पोलिसांकडून सत्कार

Pune Police MCOCA Action | माथाडी बोर्डाचे नेते असल्याचे सांगून खंडणी मागणाऱ्या टोळीवर ‘मोक्का’

Pune Minor Girl Rape Case | मारहाण करुन अल्पवयीन मुलीवर बलात्कार, चंदननगर परिसरातील घटना

Manohar Joshi Passed Away | माजी लोकसभा अध्यक्ष मनोहर जोशी यांचे निधन

Pune Crime News | दिघी येथील लॉजमधील वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश, दोन महिलांची सुटका; एकाला अटक (Video)

Pune Crime News | पोलिसांच्या तावडीतून सायबर गुन्ह्यातील महिला आरोपीचे पलायन, तर येरवडा पोलीस स्टेशन समोरून आरोपीने ठोकली धूम