Pimpri Chinchwad Police | पिंपरी : दोन तडीपार गुन्हेगारांसह तिघांना अटक, पिस्टल, दोन कोयते जप्त

0

पिंपरी : – Pimpri Chinchwad Police | लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलिसांकडून बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहेत. पोलिसांनी दोन तडीपार गुन्हेगारांसह (Tadipar Criminal Arrest) तिघांना अटक करुन पिस्टल, काडतुस व दोन कोयते जप्त करण्यात आले आहेत. याप्रकरणी पिंपरी (Pimpri Police Station) आणि चाकण पोलीस ठाण्यात (Chakan Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्हे शाखा युनिट-2 च्या पथकाने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यामागे एका तडीपार गुन्हेगाराला अटक करुन तीनशे रुपयांचा एक धारदार कोयता जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.25) दुपारी सव्वाचार वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. दत्ता संतोष धोत्रे (वय-21 रा. ओटास्कीम निगडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. दत्ता धोत्रे याला पोलीस उपायुक्त परिमंडळ-1 यांनी दोन वर्षासाठी पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. तडीपार असताना कोणतीही परवानगी न घेता तो शहरात वावरत होता. याप्रकरणी पोलीस अंमलदार शिवाजी नामदेव मुंढे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

तसेच तडीपार गुन्हेगार आदित्य राम सुर्वे (रा. 20 रा. भिमनगर, पिंपरी) याला अटक करुन त्याच्याकडून दोनशे रुपयांचा धारदार कोयता जप्त केला. ही कारवाई गुरुवारी (दि.25) रात्री साडे नऊ वाजण्याच्या सुमारास भिमनगर पिंपरी येथे केली. आरोपी आदित्य सुर्वे याला पोलीस उपायुक्त परिमंडळ -1 यांनी पुणे जिल्ह्यातून दोन वर्षासाठी तडीपार केले होते. सुर्वे कोणतीही परवानगी न घेता शहरात आला होता.याप्रकरणी पोलीस अंमलदार शिवाजी नामदेव मुंढे यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला चाकण पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडून 50 हजार रुपये किमतीची पिस्टल आणि 200 रुपयांचे जिवंत काडतूस असा एकूण 50 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई गुरुवारी (दि.25) रात्री साडे नऊच्या सुमारास कडाचीवाडी येथील चाकण-शिक्रापूर रोडवरील गणपती मंदिराजवळ केली. याप्रकरणी पोलीस हवालदार हनुमंद जयराम कांबळे (वय-38) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भरत तुकाराम जैद (वय-30 रा. चिंबळी फाटा, ता. खेड) याच्यावर आर्म अॅक्ट व महाराष्ट्र पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.