Bibvewadi Pune Crime | पुण्यातील बिबवेवाडीत 10 ते 15 जणांच्या टोळक्याकडून वाहनांची तोडफोड (Video)

0

पुणे : – Bibvewadi Pune Crime | पुण्यात वाहनांच्या तोडफोडीच्या घटना वारंवार घडत आहेत. बिबवेवाडी परिसरात पुन्हा एकादा वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. बिबवेवाडी सुपर परिसरात गुरुवारी (दि.25) रात्री अकराच्या सुमारास पार्क केलेल्या वाहनांवर कोयत्याने मारुन तोडफोड करण्यात आली. दहा ते पंधरा जणांच्या टोळक्याने वाहनांची तोडफोड करुन परिसरात दहशत माजवली.

बिबवेवाडी सुपर परिसरात रात्री अकराच्या सुमारास 10 ते 15 गुंड हातात कोयते घेऊन आले. गुंडानी 5 रिक्षा, 15 ते 20 दुचाकी आणि एका कारवर कोयत्याने वार करत वाहनांचे नुकसान करून, दहशत माजवण्याचा प्रयत्न केला आहे. तरुणांनी हातात कोयते घेऊन वाहनांची तोडफोड केली. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

या भागातील महिला लहान मुले आणि नागरिक प्रचंड दहशतीत आहेत. अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असून पोलिसांनी गुंडावर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मागील काही दिवसांपासून पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागात वाहन तोडफोडीच्या घटना घडत आहेत. पोलिसांकडून गुंडावर कारवाई करण्यात येत आहे. मात्र, अशा घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.