Pune Rape Case | पुणे : महिलेवर बलात्कार, दहा लाखांची आर्थिक फसवणूक

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – पतीचे निधन झाल्यानंतर महिलेला मदत करुन तिचा विश्वास संपादन करुन दहा लाख रुपये घेतले. मात्र, शारीरिक संबंध (Physical Relationship) ठेवले तरच पैसे परत करीन असे सांगून महिलेवर वेळोवेळी अत्याचार (Pune Rape Case) केले. याबाबत महिलेने आरोपीच्या मुलाला सांगितले असता त्याने जीवे मारण्याची धमकी देऊन आर्थिक फसवणूक (Cheating Fraud Case) केली. याप्रकरणी वानवडी पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार 2022 ते आजपर्यंत महिलेच्या राहत्या घरी व पुणे शहर व परिसरातील वेगवेगळ्या लॉजवर घडला आहे.(Pune Rape Case)

याबाबत 46 वर्षीय महिलेने मंगळवारी (दि.21) वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन हनुमंत लालु गोरगल Hanumant Lalu Gorgal (वय-56), प्रतिक हनुमंत गोरगल Pratik Hanumant Gorgal (दोघे रा. मु.पो. केडगाव ता. दौंड, जि. पुणे) यांच्यावर आयपीसी 376, 354, 509, 406, 420, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी एकमेकांच्या ओळखीचे असून आरोपी महावितरण कंपनीत कामाला आहे. पीडित महिलेच्या पतीच्या निधनानंतर आरोपीने महिलेला मदत करुन त्यांचा विश्वास संपादन केला. पतीच्या निधनानंतर विम्याचे पैसे महिलेला मिळाले होते. या पैशांवर डोळा ठेवून आरोपीने घरगुती अडचण असल्याचे सांगून दहा लाख रुपये घेतले.

काही दिवसांनी महिलेने आरोपीकडे पैशांची मागणी केली असता त्याने गैरवर्तन करुन फिर्यादी यांचा विनयभंग केला. तसेच शारीरिक सुख दिले तरच पैसे परत करेन असे सांगून महिलेसोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. तसेच महिलेला वेगवेगळ्या लॉजवर नेऊन तिच्यासोबत संबंध प्रस्थापित केले. मात्र, आरोपीने पैसे दिले नाही. त्यामुळे महिलेने आरोपीच्या मुलाला सर्व हकीकत सांगून पैशांची मागणी केली. त्यावेळी त्याने फिर्यादी यांना जीवे मारण्याची धमकी देऊन पैसे देणार नसल्याचे सांगत धमकावल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनवणे करीत आहेत.

Pune ACB Trap | पुण्यातील पोलिस अधिकार्‍यासाठी 1 लाख रूपयाच्या लाचेची मागणी, लाच स्वीकारताना खासगी व्यक्ती अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

Pune Shivajinagar Crime | कॉलेज तरुणीला मारहाण करुन भररस्त्यात विनयभंग, शिवाजीनगर येथील प्रकार

Pune CP Amitesh Kumar | पुणे पोलिसांनी दिल्लीमध्ये केलेल्या छापेमारीत 970 किलो एमडी जप्त ! आतापर्यंत एकुण 3500 कोटीचं 1700 किलो एमडी जप्त, केमिकल एक्सपर्टसह 8 जणांना अटक – पोलिस आयुक्त अमितेश कुमार (Video)

Pune Sinhagad Road Murder | धायरीत जागेच्या वादातून तरुणाचा खून, सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल (Video)

Leave A Reply

Your email address will not be published.