DES Pune | डीईएस पुणे विद्यापीठाची प्रवेश प्रक्रिया सुरू

0

पुणे : DES Pune | डीईएस पुणे विद्यापीठाने इंजिनीअरिंग व टेक्नॉलॉजी, सायन्स व मॅथेमॅटिक्स, ह्यूमॅनिटीज व सोशल सायन्स, डिझाईन व आर्टस आणि कॉमर्स व मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांसाठी या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती विद्यापीठाचे प्रेसिडेंट डॉ. रवींद्र आचार्य यांनी पत्रकार परिषदेत दिली. डीईएसचे उपाध्यक्ष ॲड. अशोक पलांडे, कुलगुरु डॉ. प्रसाद खांडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

आचार्य म्हणाले, डीईएसला शिक्षण क्षेत्रात 139 वर्षांचा वारसा आहे. संस्थेच्या 18 महाविद्यालये आणि 36 शाळांमधून साठ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. डीईएस व्यवस्थापनाच्या वतीने पुण्यात फर्ग्युसन आणि बीएमसीसी ही महाविद्यालये चालविली जातात. गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि किफायतशीर शुल्क यामुळे या महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांची रीघ लागते. या विद्यार्थ्यांना डीईएस व्यवस्थापनाने शिक्षणासाठी आणखी एक पर्याय उपलब्ध करून दिला आहे. डीईएसचे व्यवस्थापन, अनुभवी प्राध्यापक, पायाभूत सुविधांची उपलब्धता यामुळे गुणवत्तापूर्ण व किफायतशीर शिक्षण देता येईल. भारतीय ज्ञान परंपरा, पर्यावरण आणि तंत्रज्ञान हा विद्यापीठाचा पाया असून, संशोधनाला प्रोत्साहन दिले जाणार आहे.

खांडेकर म्हणाले, कम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग, कम्प्युटर सायन्स, कम्प्युटर ॲप्लिकेशन्स, डेटा सायन्स, स्टॅटिस्टिक्स, इकॉनॉमिक्स, सायकॉलॉजी, फिल्म मेकिंग, इंटेरियर डिझायनिंग व यूजर एक्सपीरियन्स, ड्रामॅटिक्स, ॲनिमेशन, बीबीए, एमबीए बीबीएआयबी, पीजीडीबीडीए, पीजीडीबीएफ, पीजीडीटी या विषयांच्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी 2200 जागा उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी www.despu.edu.in http://www.despu.edu.in या संकेतस्थळावर संपर्क साधावा.

Leave A Reply

Your email address will not be published.