Sharad Mohol Murder Case | शरद मोहोळ खून प्रकरण : पुणे पोलिसांकडून 1750 पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात सादर

0

पुणे : – Sharad Mohol Murder Case | पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा 5 जानेवारी रोजी कोथरुड भागातील सुतारदरा (Sutardara Kothrud) भागात खून करण्यात आला होता (Sharad Mohol Gang). याप्रकरणात पुणे पोलिसांनी (Pune Police) विशेष न्यायालय, शिवाजीनगर येथे दोषारोपपत्र दाखल केले आहे (Pune Shivaji Nagar Court). बुधवारी (दि.22) विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयात गुन्हे शाखेने 18 आरोपीविरुद्ध 1750 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. (Chargesheet In Sharad Mohol Murder Case)

शरद मोहोळ खून प्रकरणी गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु होता. सहायक पोलीस आयुक्त सुनील तांबे यांच्या पथकाने या गुन्ह्याचा तपास केला. यानंतर गुन्हे शाखेकडून आरोपीं विरुद्ध विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. या प्रकरणात आतापर्यंत 17 जणांना अटक केली असून एक जण फरार आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार याच्यासह इतर आरोपी येरवडा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत.

या प्रकरणात आत्तापर्यंत १६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह अन्य आरोपी सध्या येरवडा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. 5 जानेवारी रोजी गुन्हा घडल्यानंतर 9 जानेवारी रोजी गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. त्यानंतर आरोपींवर 27 जानेवारी रोजी मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली. गुन्ह्यात दोषारोपपत्र सादर करण्यासाठी 139 दिवसात दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली.

गणेश मारणे, विठ्ठल शेलार याच्यासह साहिल ऊर्फ मुन्ना संतोष पोळेकर, रामदास ऊर्फ वाघ्या मारणे, धनंजय मारुती वटकर, नामदेव महिपती कानगुडे, अमित ऊर्फ अमर मारुती कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गव्हाणकर, विठ्ठल किसन गांदले, ॲड. रवींद्र पवार, ॲड. संजय उडान, सतीश संजय शेडगे, नितीन अनंता खैरे, आदित्य विजय गोळे, संतोष दामोदर कुरपे यांच्याविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोका) कारवाई करण्यात आली.

शरद मोहोळ हा पाच जानेवारी रोजी कोथरुड परिसरातील सुतारदरा येथील राहते घरातून बाहेर पडल्यानंतर त्याचा सहकारी मुन्ना पोळेकर व इतरांनी मिळून त्याच्यावर जवळून गोळ्या झाडल्या होत्या. त्यात शरद मोहोळचा जागीच मृत्यू झाला होता. खून केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले होते. गुन्हे शाखेचे दोन सहायक पोलीस आयुक्त, 8 पोलीस निरीक्षक, 20 सहायक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक व 50 अंमलदार यांनी आरोपींचा शोध घेऊन अटक केली.

शरद मोहोळचा खून झाल्यानंतर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पुणे-सातारा रस्त्यावर शिरवळजवळ मोटारीचा पाठलाग करून आठ आरोपींना अटक केली होती. त्यांच्याकडून तीन पिस्तुलांसह तीन मॅगझीन, पाच काडतुसे आणि दोन मोटारी ताब्यात घेतल्या होत्या. जमिनीच्या आणि आर्थिक वादातून खून केल्याचे तपासात समोर आले आहे.

गुन्ह्यात वापरलेल्या 7 गाड्या जप्त

या गुन्ह्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. पोलीस चौकशीत आरोपींच्या मोबाईल मधून सुत्रधार व इतरांशी करण्यात आलेल्य संर्पकाच्या तब्बल 19 हजार 827 क्लीप पोलिसांना मिळाल्या. त्यातील गुन्ह्याच्या काटाच्या सहा महत्वपूर्ण क्लीप पुराव्याच्या दृष्टीने न्यायालयात सादर करण्यात आल्या. आरोपींनी गुन्हा करण्यासाठी व नंतर वापरलेल्या 7 गाड्या पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.