Pune Sinhagad Road Murder | धायरीत जागेच्या वादातून तरुणाचा खून, सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Sinhagad Road Murder | जागेच्या वादातून एका तरुणावर धारदार हत्याराने वार करुन निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि.20) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास सिंहगड रस्ता परिसरातील रायकर मळा येथे घडली आहे (Murder In Raikar Mala). आदित्य उर्फ राजू जनार्दन पोकळे (वय-19 रा. खंडोबाचा मळा, रायकर मळा, धायरी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी मृत आदित्य याच्या नातेवाईकांवर सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. (Pune Sinhagad Road Murder)

सिहंगड रोड पोलिसांनी आदित्यचे नातेवाईक संपत तानाजी काळोखे व सागर पोपट रायकर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. घटनेनंतर आरोपी पसार झाले असून त्यांच्या शोधार्थ पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, आदित्य व आरोपी नातेवाईक असून त्यांच्यामध्ये जागेवरून वाद सुरु आहेत. दरम्यान मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता या वादग्रस्त जागेवर आदित्य कामगारांसह पत्रा शेडचे काम करत होता. (Pune Crime News)

त्यावेळी आरोपी संपत काळोखे व सागर रायकर हे त्या ठिकाणी आले. यावेळी आदित्य व संपत यांच्यात वाद झाला. त्यानंतर दोघांनी आदित्यच्या पाठीत धारदार शस्त्राने सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरुन पळून गेले. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार (Sr PI Vijay Kumbhar) यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपींचा शोध घेण्यासाठी तपास पथके रवाना करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. पुढील तपास सिंहगड रोड पोलीस (Sinhagad Road Police Station) करीत आहेत.

Pune Shivaji Nagar Police | जबरी चोरी करुन कोयते बाळगणारी टोळी शिवाजीनगर पोलिसांकडून गजाआड (Video)

Pune Police Crime Branch | पुणे: गुन्हे शाखेकडून राजधानी दिल्लीत छापेमारी, 400 किलो ‘एमडी’ जप्त; पुणे पोलिसांकडून तब्बल 2200 कोटी रुपयांचे 1100 किलो एमडी (MD) जप्त (Videos)

Pune Police News | पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचा कुरकुंभ येथील कंपनीवर छापा, 1100 कोटी रुपयांचे 600 किलो मेफेड्रॉन (एमडी) जप्त (Video)

Leave A Reply

Your email address will not be published.