Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी परिसरात भीषण स्फोट; सहा ते सात कामगार गंभीर जखमी (Videos)

0

डोंबिवली: Dombivli MIDC Blast | डोंबिवली एमआयडीसी परिसरात भीषण स्फोट झाल्याची माहिती समोर येत आहे. स्फोटाचे नेमके कारण आणि त्याची तीव्रता याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. एमआयडीसीतील कंपनीतील बॉयलरमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एमआयडीसी परिसरातील अमोधन केमिकल कंपनीतील बॉयलरमध्ये हा स्फोट झाल्याची माहिती आहे मात्र कंपनीचे नाव समजू शकलेले नाही. या स्फोटाने डोंबवलीच्या परिसरात स्फोटाचे हादरे जाणवले.

अनेक इमारतीच्या काचा फुटल्या आहेत. या स्फोटात किती जीवितहानी झाली आहे याकडे सर्वांचे लक्ष आहे. अग्निशमन दलाच्या पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या दुर्घटनेत सहा ते सात कामगार गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्तीचे प्रयत्न सुरू आहेत.

स्फोटाची प्रत्यक्षदर्शींकडून माहिती

या भीषण स्फोटानंतर एमआयडीसीतून बाहेर पडलेल्या कामगाराने माध्यमांना माहिती देताना सांगितले की, स्फोट झाला ती आमच्या बाजूची कंपनी होती. स्फोट एवढा मोठा होता की आगीचे लोळ येऊन आमच्या हाताला भाजले आहे.

अनेक इमारतींच्या फुटल्या काचा

हे स्फोट एवढे मोठे होते की दोन ते तीन किलोमीटर पर्यंत याचे हादरे जाणवले. अनेकांच्या घराच्या काचा तुटल्या. अजूनही याठिकाणी स्फोट सुरू आहे. आग भीषण असल्याने अग्निशमन जवानांना आतमध्ये जाणे अद्याप शक्य झालेले नाही.

स्फोटामुळे 25 ते 30 जण जखमी

या स्फोटाच्या दुर्घटनेत आतापर्यंत 25 ते 30 जणांवर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती राज्याचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली.

स्फोटानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, “घटनास्थळी रेस्क्यू टीम, जिल्हाधिकारी आणि खासदार पोहोचले आहेत. तेथील परिस्थिती नियंत्रणात आहे. माझ्या माहितीनुसार या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.