Pune Shivajinagar Crime | कॉलेज तरुणीला मारहाण करुन भररस्त्यात विनयभंग, शिवाजीनगर येथील प्रकार

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – भेटण्यास नकार दिल्याच्या रागातून एका तरुणाने कॉलेज तरुणीला भररस्त्यात कानशिलात लगावत तिच्या सोबत गैरवर्तन करुन विनयभंग (Molestation Case) केला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी धनकवडी येथील तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.20) दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास मॉर्डन कॉलेज जवळील फुटपाथवर घडला आहे. (Pune Shivajinagar Crime)

याबाबत कात्रज येथे राहणाऱ्या 19 वर्षीय तरुणीने बुधवारी (दि.21) शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) फिर्याद दिली आहे. यावरुन चेतन बाजीराव चव्हाण Chetan Bajirao Chavan (वय-22 रा. समर्थ कॉम्पलेक्स, धनकवडी) याच्यावर आयपीसी 354, 354(ड) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी ऐकमेकांच्या ओळखीचे आहेत. मुलीने चेतन याला तू मला फोन करु नकोस तसेच माला भेटू नकोस असे सांगितले. मात्र, त्याने मुलीला वारंवार फोन करुन बोलण्याचा प्रयत्न करुन कॉलेज बाहेर येऊन मला तुझ्याशी बोलायचे आहे असे म्हणत तिच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला.

मंगळवारी दुपारी पीडित तरुणी कॉलेज जवळ असलेल्या फुटपाथवर थांबली होती. त्यावेळी आरोपी त्याठिकाणी आला. त्याने मुलीसोबत बोलण्याचा बहाणा करुन जोर जोरात ओरडून म्हणाला, कोण आहेत ते तुझे मित्र, ते माझी बदनामी का करतात. त्यावेळी फिर्यादी यांनी त्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला असता त्याने सर्वांसमोर तिच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. तसेच मुलीचा हात पकडून तिच्या कानशीलात लगावली. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव करीत आहेत.

Pune CP Amitesh Kumar | पुणे पोलिसांनी दिल्लीमध्ये केलेल्या छापेमारीत 970 किलो एमडी जप्त ! आतापर्यंत एकुण 3500 कोटीचं 1700 किलो एमडी जप्त, केमिकल एक्सपर्टसह 8 जणांना अटक – पोलिस आयुक्त अमितेश कुमार (Video)

Pune Sinhagad Road Murder | धायरीत जागेच्या वादातून तरुणाचा खून, सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल (Video)

Pune Crime News | पत्र्याच्या शेडमध्ये घरगुती गॅस छोट्या सिलेंडरमध्ये भरुन चोरी; लोखंडी पिनद्वारे करत होता गॅस ट्रान्सफर

Pune Khadak Crime | पुणे : घरच्यांना मारुन टाकण्याची धमकी, ट्यूशनला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत भररस्त्यात गैरवर्तन

Leave A Reply

Your email address will not be published.