Pune Sadashiv Peth Crime | जिममधून 73 लाखांच्या किमती सामानाची चोरी, सदाशिव पेठेतील घटना

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Sadashiv Peth Crime | पुण्यातील सदाशिव पेठेत असणाऱ्या एका जिममधून रोख रक्कम व किंमती सामान असा एकूण 73 लाख 38 हजार 515 रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेला. हा प्रकार सप्टेंबर 2022 ते जून 2023 या कालावधीत सीटी बारबेल क्लब (CT Barbell Club), जिम टीसीजी स्केअर (Gym TCG Scare) येथे घडला आहे. याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी सहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. (Pune Sadashiv Peth Crime)
याबाबत कर्वेरोड येथे राहणाऱ्या 62 वर्षीय महिलेने बुधवारी (दि.21) विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishram Bagh Police Station) फिर्याद दिली आहे. यावरून राहुल हरिभक्त, संकेत हरिभक्त, आर्यन हरिभक्त, विवेकानंद एस किसरकर, विनायक केशव बापट, अविनाश आनंद जाधव यांच्यावर आयपीसी 323, 427, 428, 451, 453, 454, 504, 506, 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची सदाशिव पेठेत जिम असून आरोपी त्यांच्या ओळखीचे आहेत. आरोपींनी फिर्यादी यांना वेळोवेळी शिवीगाळ व दमदाटी करुन धक्कबुक्की केली. फिर्यादी यांची जिम बंद असताना आरोपींनी जिममधील किंमती सामान व रोख रक्कम चोरून नेले. याबाबत फिर्यादी यांनी न्यायालयात दाद मागितली. न्यायालयाने सीआरपीसी कलम 156(3) नुसार आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. त्यानुसार पोलिसांनी सहा जणांवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष मोरे करीत आहेत.
Pune Shivajinagar Crime | कॉलेज तरुणीला मारहाण करुन भररस्त्यात विनयभंग, शिवाजीनगर येथील प्रकार