Pune ACB Trap | पुण्यातील पोलिस अधिकार्‍यासाठी 1 लाख रूपयाच्या लाचेची मागणी, लाच स्वीकारताना खासगी व्यक्ती अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune ACB Trap | फसवणूक प्रकरणात (Cheating Fraud Case) पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या अर्जाच्या चौकशी प्रकरणात मध्यस्थी करणाऱ्या खाजगी व्यक्तीने पोलीस अधिकाऱ्यासाठी एक लाख रुपयांची लाच मागितली. त्यापैकी 25 हजार रुपये स्वीकारताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने इम्पोर्ट एक्स्पोर्ट व्यवसाय करणाऱ्या खासगी व्यक्तीला रंगेहात पकडले. ही कारवाई बुधवारी (दि.21) कात्रज परिसरातील सुखसागर नगर (Sukhsagar Nagar, Katraj) येथील स्वामी समर्थ स्नॅक्स सेंटर येथे केली. (Pune Bribe Case)

तुषार शीतल बनकर Tushar Sheetal Bankar (वय-30 रा. आंबेगाव पठार, पुणे) असे लाच घेताना अटक केलेल्या खाजगी व्यक्तीचे नाव आहे. याबाबत 42 वर्षीय व्यक्तीने पुणे एसीबीकडे तक्रार केली आहे. तक्रारदार यांच्या विरोधात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यातील (Bharti Vidyapeeth Police Station) सायबर युनिट कडे फसवणुकीचा ऑनलाईन तक्रार अर्ज दाखल झाला होता. या अर्जाची चौकशी पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे (PSI Sanjay Narle) यांच्याकडे आहे. संजय नरळे यांना सांगून मदत करण्यासाठी व प्रकरण मिटवण्यासाठी तुषार बनकर याने संजय नरळे यांच्यासाठी एक लाख रुपये लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबी कार्यालयात तक्रार दिली. (Pune ACB Trap)

एसीबीच्या पथकाने 13 आणि 20 फेब्रुवारी रोजी पडताळणी केली. त्यावेळी आरोपी तुषार बनकर याने तक्रारदार यांच्याकडे फसवणुकीच्या प्रकरणात मदत करण्यासाठी व प्रकरण मिटवण्यासाठी पीएसआय संजय नरळे यांच्यासाठी एक लाख रुपये लाचेची मागणी केली. तसेच लाचेची रक्कम टप्प्या टप्प्याने देण्यास सांगून लाचेचा पहिला हप्ता 25 हजार रुपांची मागणी केली. त्यानुसार बुधवारी सुखसागर नगर चौकातील स्वामी समर्थ स्नॅक सेंटर जवळ पथकाने सापळा रचला. तक्रारदार यांच्याकडून 25 हजार रुपये स्वीकारताना तुषार बनकर याला रंगेहाथ पकडण्यात आले.

त्याच्यावर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पुणे एसीबीचे पोलीस निरीक्षक प्रविण निंबाळकर करीत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे एसीबीच्या पथकाने केली.

Pune Shivajinagar Crime | कॉलेज तरुणीला मारहाण करुन भररस्त्यात विनयभंग, शिवाजीनगर येथील प्रकार

Pune CP Amitesh Kumar | पुणे पोलिसांनी दिल्लीमध्ये केलेल्या छापेमारीत 970 किलो एमडी जप्त ! आतापर्यंत एकुण 3500 कोटीचं 1700 किलो एमडी जप्त, केमिकल एक्सपर्टसह 8 जणांना अटक – पोलिस आयुक्त अमितेश कुमार (Video)

Pune Sinhagad Road Murder | धायरीत जागेच्या वादातून तरुणाचा खून, सिंहगड रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल (Video)

Pune Crime News | पत्र्याच्या शेडमध्ये घरगुती गॅस छोट्या सिलेंडरमध्ये भरुन चोरी; लोखंडी पिनद्वारे करत होता गॅस ट्रान्सफर

Pune Khadak Crime | पुणे : घरच्यांना मारुन टाकण्याची धमकी, ट्यूशनला जाणाऱ्या अल्पवयीन मुलीसोबत भररस्त्यात गैरवर्तन

Leave A Reply

Your email address will not be published.