Shivsena UBT Vs Congress In Maharashtra | ‘आघाडीत बिघाडी, आगामी निवडणुकीत काँग्रेसच्या नेत्यांना विधानसभेचे तोंड बघू देणार नाही, अशी शपथ घेतलीय’ – शिवसेना

0

सांगली : Shivsena UBT Vs Congress In Maharashtra | सांगली लोकसभा मतदारसंघात (Sangli Lok Sabha) काँग्रेसचा दावा असताना शिवसेना ठाकरे गटाने थेट चंद्रहार पाटील यांना उमेदवारी जाहीर केली होती. यानंतर काँग्रेसमधून प्रचंड नाराजी व्यक्त केली गेली. दरम्यान, येथून काँग्रेसचे विशाल पाटील यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेने केली होती. मात्र, नुकतेच काँग्रेसने आयोजित केलेल्या स्नेहभोजनाला विशाल पाटील (Vishal Patil) उपस्थित राहिल्याने शिवसेनेने संताप व्यक्त केला आहे.

या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमाला विशाल पाटील यांनी हजेरी लावल्यामुळे ठाकरे गटाने नाराजी व्यक्त केली. तसेच शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभुते यांनी थेट काँग्रेसला इशारा दिला आहे.

संजय विभुते यांनी म्हटले की, सांगलीत काँग्रेसने निवडणुकीत पहिल्या दिवसापासून गद्दारी केली. राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीला मदत करण्याची भूमिका घेतली. परंतु शेवटी राष्ट्रवादी काँग्रेसही विशाल पाटील यांच्यासोबत गेली. काँग्रेसचे स्नेहभोजन म्हणजे अधिकृत गद्दारी केल्याचा पुरावा आहे.

संजय विभुते म्हणाले, काँग्रेसने विशाल पाटील यांची हकालपट्टी केली नाही म्हणजेच गल्लीपासून दिल्लीपर्यंतची काँग्रेस विशाल पाटील यांच्या पाठीशी होती. आघाडी टिकवायची असल्यास त्यांची हकालपट्टी करावी, अन्यथा सांगलीत आघाडी राहणार नाही. येत्या निवडणुकीत विधानसभेमध्ये काँग्रेसच्या नेत्यांना विधानसभेचे तोंड बघू देणार नाही, अशी शपथ शिवसेनेने घेतली आहे, असे विभूते म्हणाले.

विभुते पुढे म्हणाले, उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भांडण संपले पाहिजे. परंतु ते शेवटपर्यंत जिवंत ठेवण्याचे काम काँग्रेसने केले. काँग्रेसने आता सांगलीत शिवसेनेकडून मदतीची अपेक्षा ठेवू नये. आमची लायकी निवडून येणारी नसली तरी तुम्हाला पाडण्याची लायकी नक्कीच आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.