24 People Drowned In 7 Incidents In Maharashtra | उजनीसह राज्यात 7 दुर्घटनांमध्ये 24 जणांचा बुडून मृत्यू, महाराष्ट्र हळहळला

0

मुंबई : 24 People Drowned In 7 Incidents In Maharashtra | मागील एक-दोन दिवसात राज्यात ७ दुर्घटनांमध्ये २४ जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. या घटनांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. उजनी धरणात बोट दुर्घटनेत ६ जणांचा बुडून मृत्यू (Ujani Dam Backwater Boat Accident), नाशिकच्या इगतपुरीमधील भावली धरणात ५ जणांचा बुडून मृत्यू (Nashik Bhavali Dam), इगतपुरीमधीलच (Igatpuri) विहिरीत पडून मायलेकीचा मृत्यू, तर प्रवरा नदीत (Pravara River) पोहायला गेलेले २ जण बुडाले. या दोघांचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफची (SDRF Boat Accident) गेलेली बोट उलटल्याने ३ जणांचा मृत्यू झाला.

तसेच पुण्यात आजोबांसोबत पोहण्यासाठी गेलेल्या दोन सख्या भावंडाचा बुडून मृत्यू झाला तर बीडमध्ये दोन मुलांसह महिलेचा बुडून मृत्यू झाला. नागपूरमध्ये तलावात बुडून तरुणाचा मृत्यू झाला. लागोपाठ घडलेल्या या घटनांमुळे महाराष्ट्र हादरला आहे.

२१ मे रोजी पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात उजनी धरणाच्या जलाशयात वादळीवारे आणि पावसामुळे बोट बुडाल्याने ६ जण बेपत्ता झाले होते. त्यांचे मृतदेह आज सापडले. गोकूळ दत्तात्रय जाधव (३०), कोमल गोकूळ जाधव (२५), शुभम गोकूळ जाधव (दीड वर्ष), माही गोकूळ जाधव (३), अनुराग अवघडे (३५), गौरव डोंगरे (१६) अशी मृतांची नावे आहेत.

मंगळवारी सायंकाळी पाच वाजता नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील भावली धरण परिसरात पोहायला उतरलेल्या ५ जणांचा धरणात बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन मुलींसह दोन तरुणाचा समावेश आहे. हे सर्वजण नाशिकरोड येथील गोसावीवाडीतील रहिवासी आहेत. हनिफ शेख, अनस खान दिलदार खान (१५), नाझिया इमरान खान (१५), मीजबाह दिलदार खान (१६) आणि ईकरा दिलदार खान (१४) अशी मृतांची नावे आहेत.

इगतपुरीमध्ये आणखी एक अशीच घटना घडल असून येथील मुंढेगाव येथील जिंदाल कंपनीजवळील शासकीय आश्रम शाळेच्या परिसरातील एका विहिरीत बुडून मायलेकीचा मृत्यू झाला. प्रियंका नवनाथ दराणे (२३) आणि वेदश्री नवनाथ दराणे (०३) अशी त्यांचे नावे आहेत.

तर प्रवरा नदीत २ तरुण पोहण्यासाठी गेले असता दोघेही पाण्यात बुडाले. त्यांचा शोध घेण्यासाठी एसडीआरएफची बोट गेली असता ही बोट उलटून ३ जणांचा मृत्यू झाला. तर दोन जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पुणे जिल्ह्यातील पाबळमध्ये (Pabal) आजोबांसोबत शेततळ्यात पोहायला गेलेल्या २ मुलांचा बुडून मृत्यू झाला. आर्यन नवले आणि आयुष नवले, अशी साधारण तेरा वर्षांची ही मुले आहेत.

तसेच बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील (Beed Kaij) युसुफवडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अंजनपुर (ता. अंबाजोगाई) येथील १ महिलेचा २ मुलांसह विहिरीत बुडून मृत्यू झाला. द्रौपदी संतोष गोईनवाड, पूजा (७), सुदर्शन (७) अशी त्यांची नावे आहेत.

आज गुरुवारी सकाळी १० वाजता नागपूर येथील वाठोडा परिसरात तलावात (Nagpur Wathoda Dam) पोहायला उतरलेल्या १ तरूणांचा बुडून मृत्यू झाला. त्याचे नाव विनीत राजेश मनघटे (१८) असे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.