Wanwadi Pune Crime News | पुणे : लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार, दोघांवर FIR

0

पुणे : – Wanwadi Pune Crime News | विवाहित महिलेसोबत मैत्री करुन तिला लग्नाचे आमिष (Lure Of Marriage) दाखवून शारीरिक संबंध (Physical Relationship) प्रस्थापित केले. यातून पिडीत महिलेला चार वेळा गरोदर करुन तिला जबरदस्तीने गोळ्या खाण्यास देऊन गर्भपात केल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार 2017 ते 21 मे 2024 या कालावधीत घडला आहे. याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात (Wanwadi Police Station) दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत 29 वर्षीय पिडीत महिलेने मंगळवारी (दि.21) वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अमित चव्हाण (रा. काळेपडळ) व त्याचा मित्र अमोल (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) यांच्यावर आयपीसी 376, 376/2/एन/जे/3,354(अ) नुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिलेची परिसरात राहणाऱ्या आरोपी अमित चव्हाण सोबत 2017 मध्ये ओळख झाली.

आरोपीने महिलेसोबत मैत्री करुन लग्न करण्याचे आमिष दाखवले. त्यानंतर महिलेला वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले. यातून महिला गरोदर राहिल्यानंतर आरोपीने तिला जबरदस्तीने गर्भपाताच्या गोळ्या खायला देऊन चार वेळा गर्भपात केला. तसेच आरोपीचा मित्र अमोल याने देखील महिलेकडे शारीरिक संबंधाची मागणी करुन अश्लिल बोलून विनयभंग केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक टोणे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.