Pune Navale Bridge Accident | नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; डंपरची ट्रॅव्हल्सला धडक, अपघातात सात जण जखमी

Pune Navale Bridge Accident

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Navale Bridge Accident | बंगळुरु-मुंबई महामार्गावर (Pune–Bengaluru Highway) उतारावर वाहनाचा वेग नियंत्रित राखता न आल्याने नवले पुल दरम्यान वारंवार अपघात होत असतात. पण, आज मुंबई -बंगळुरु महामार्गावर कात्रजकडे जाणार्‍या रस्त्यावर अपघात घडला. कंपनीच्या कार्यालयाच्या जागेतून बाहेर पडत असताना मुंबईकडून वेगाने आलेल्या डंपरने बसला जोरात धडक दिली. त्यात ७ प्रवासी जखमी झाले. हा अपघात शुक्रवारी सकाळी ७ वाजता घडला. (Pune Navale Bridge Accident)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवले पुलाजवळ व्हीआर एल ट्रॅव्हल्स कंपनीचे (VRL Travels) कार्यालय आहे. कंपनीची बस प्रवाशांना घेऊन सकाळी सात वाजण्याच्या सुमारास कार्यालयाच्या जागेतून बाहेर पडून मुख्य रस्त्यावर येत होती. त्यावेळी मुंबईकडून वेगाने आलेल्या डंपरला ही बस दिसलीच नाही. त्याने बसला चुकविण्याचा प्रयत्न केला. परंतु, वेगात असलेल्या डंपरने बसच्या उजव्या बाजूला पाठीमागून जोरदार धडक दिली.

त्यात बसचे तसेच डंपरचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातात ७ जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन काही वेळातच दोन्ही वाहने बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली.

Pune Crime News | पुणे: कॉलेज तरुणाला गांजाच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी ! पोलिसांनीच उकळली 5 लाखांची खंडणी; पोलीस नाईक हेमंत गायकवाड, पोलीस शिपाई सचिन शेजाळ यांच्यावर FIR (Video)

Pune Hadapsar Crime | पुण्यात सहायक पोलीस आयुक्तांच्या (ACP) मुलाच्या दुकानातून 2 कोटींचे सोने पळवले

Pune Bibvewadi Crime | जुन्या भांडणाच्या कारणावरुन टोळक्याचा कोयत्याने तरुणावर वार; बिबवेवाडीत पसरवली दहशत

Pune Lonikand Crime | तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; बांधकाम व्यावसायिकासह 15 जणांवर गुन्हा दाखल

Senior Journalist Digambar Darade | पत्रकार दिगंबर दराडेंचं ‘ऋषी सुनक’ व ‘सुंदर पिचाई’ वर्ल्ड बुक फेअरमध्ये

Pune Crime News | व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला मजनूने ब्लेडने स्वत:ला केले जखमी; अल्पवयीन मुलीने नकार दिल्याने केले कृत्य