Pune Crime News | व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला मजनूने ब्लेडने स्वत:ला केले जखमी; अल्पवयीन मुलीने नकार दिल्याने केले कृत्य

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | व्हॅलेंटाईन डेच्या पार्श्वभूमीवर अल्पवयीन मुलीने संबंध ठेवण्यास नकार दिल्याने एका मजनूने स्वत:च्या हातावर ब्लेडने मारुन घेऊन स्वत:ला जखमी करण्याचा प्रकार समोर आला आहे. (Attempt To Suicide)

याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी (Bharti Vidyapeeth Police) युवराज रवींद्र बारडे (वय २४, रा. पर्वती दर्शन) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत दत्तनगर परिसरातील एका १६ वर्षाच्या तरुणीने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद (गु. रजि. नं. १४०/२४) दिली आहे. हा प्रकार फिर्यादीच्या राहत्या घरी मंगळवारी दुपारी सव्वा दोन वाजता घडला. (Pune Crime News)

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी युवराज बारडे याने फिर्यादी यांच्याशी २०२३ पासून मैत्री करुन त्यांच्याशी जवळीक वाढविली. तू आवडतेस तुला मीच शिवणार, तुझ्यावर फक्त माझाच अधिकार आहे, बोलत असे़ जर माझ्याशी नाही बोलली व माझ्याशी संबंध नाही ठेवले तर मी माझे बरेवाईट करुन घेईल, अशी धमकी देत असत. फिर्यादी यांच्याशी लैगिक संबंध ठेवण्याच्या उद्देशाने तो बोलू लागल्याने फिर्यादी या घरी निघून आल्या.

त्यांचा पाठलाग करुन तो फिर्यादीच्या घरी आला. फिर्यादी यांनी त्याच्याशी संबंध ठेवण्यासाठी नकार दिल्याने तुम्हाला आता दाखवतोच काय असते ते असे म्हणून स्वत:ला ब्लेडने मारुन घेऊन जखमी केले आहे. पोलिसांनी या मजनूविरुद्ध पोक्सो व विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक स्वप्नील पाटील (API Swapnil Patil) तपास करीत आहेत.

API And Two Lady Cops Suspended In Pune | पुणे: सहाय्यक पोलिस निरीक्षकासह (API) दामिनी पथकातील 2 महिला पोलिस तडकाफडकी निलंबीत

Cops Suspended In Pune | पुण्यातील 2 पोलिस कर्मचारी तडकाफडकी निलंबीत

Pune Nirbhay Bano Sabha Rada | पत्रकार निखील वागळे यांच्यावरील हल्ल्याप्रकरणाची वस्तुस्थिती तपासून 307 चा गुन्हा दाखल करणार पोलीस आयुक्तांची ग्वाही

Leave A Reply

Your email address will not be published.