ACB Trap Case | जमिनीच्या व्यावसायिक वापराच्या परवानगीसाठी 5 लाखांची लाच घेणारे मुख्याधिकारी, नगररचनाकार जाळ्यात

0

मुख्याधिकारी डोईफोडे आणि नगररचनाकार कस्तुरे यांच्यावर कारवाई

लातूर : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – ACB Trap Case | जमिनीच्या व्यावसायिक वापराच्या परवानगीसाठी ५ लाख रुपयांची लाच घेताना नगररचनाकाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून रंगेहाथ पकडले. अहमदपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी काकासाहेब सिद्धेश्वर डोईफोडे Kakasaheb Siddheshwar Doifode (वय ३९) आणि नगररचनाकार अजय विजयकुमार कस्तुरे Ajay Vijaykumar Kasture (वय ५५, रा. मोतीनगर, लातूर) अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत. (Latur ACB-Bribe Case)

याबाबत एका वकिलाने तक्रार केली होती. तक्रारदार यांची मरशीवणी येथे जमीन असून तिचा व्यावसायिक वापरासाठी प्राथमिक परवानगी मिळाली होती. अंतिम परवानगी मिळण्यासाठी त्यांनी अहमदपूर नगरपरिषदेकडे अर्ज केला. या कामासाठी त्यांनी नगररचनाकार कस्तुरे यांची भेट घेतली असता त्यांच्या व मुख्याधिकारी यांच्यासाठी ७ लाख रुपयांची मागणी केली. त्यांनी लातूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. (ACB Trap Case)

त्यानुसार त्यांच्या तक्रारीची पडताळणी केली. तेव्हा तक्रारदार यांनी ५ लाख रुपये आता देतो, २ लाख काम झाल्यावर देतो,
असे सांगितले. त्याला कस्तुरे यांनी संमती दर्शविली. त्यानंतर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने नगरपरिषद कार्यालयाबाहेर
सापळा लावला. तक्रारदार हे त्यांच्या कारमध्ये बसवून होते.

कस्तुरे हे खाली आले. त्यांनी कारमध्ये येऊन ५ लाख रुपये घेऊन कार्यालयात जाताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना ५ लाख रुपयांसह पकडले. त्यावेळी मुख्याधिकारी काकासाहेब डोईफोडे हे भक्तीस्थळ पाहणीसाठी गेले होते. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी तेथे जाऊन डोईफोडे याला ताब्यात घेतले. अहमदपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune Navale Bridge Accident | नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; डंपरची ट्रॅव्हल्सला धडक, अपघातात सात जण जखमी (Video)

Pune Crime News | पुणे: कॉलेज तरुणाला गांजाच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी ! पोलिसांनीच उकळली 5 लाखांची खंडणी; पोलीस नाईक हेमंत गायकवाड, पोलीस शिपाई सचिन शेजाळ यांच्यावर FIR (Video)

Pune Hadapsar Crime | पुण्यात सहायक पोलीस आयुक्तांच्या (ACP) मुलाच्या दुकानातून 2 कोटींचे सोने पळवले

Pune Bibvewadi Crime | जुन्या भांडणाच्या कारणावरुन टोळक्याचा कोयत्याने तरुणावर वार; बिबवेवाडीत पसरवली दहशत

Pune Lonikand Crime | तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; बांधकाम व्यावसायिकासह 15 जणांवर गुन्हा दाखल

Senior Journalist Digambar Darade | पत्रकार दिगंबर दराडेंचं ‘ऋषी सुनक’ व ‘सुंदर पिचाई’ वर्ल्ड बुक फेअरमध्ये

Pune Crime News | व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला मजनूने ब्लेडने स्वत:ला केले जखमी; अल्पवयीन मुलीने नकार दिल्याने केले कृत्य

Leave A Reply

Your email address will not be published.