Pune Crime News | पुणे: कॉलेज तरुणाला गांजाच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी ! पोलिसांनीच उकळली 5 लाखांची खंडणी; पोलीस नाईक हेमंत गायकवाड, पोलीस शिपाई सचिन शेजाळ यांच्यावर FIR

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | गांजाच्या खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी देऊन देहुरोड पोलिसांनी (Dehu Road Police) कॉलेज तरुणाकडे 20 लाखांची मागणी करुन जबरदस्तीने पाच लाख रुपये खंडणी (Extortion Case) उकळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दोन पोलीस कर्मचाऱ्यांसह आठ जणांवर देहुरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन चार जणांना अटक केली आहे. हा प्रकार उघडकीस आल्याने पिंपरी चिंचवड पोलीस (Pimpri Chinchwad Police) दलात खळबळ उडाली आहे. हा प्रकार 10 फेब्रुवारी रोजी दुपारी सव्वाबारा ते 11 फेब्रुवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान सिम्बायोसिस कॉलेज जवळील सेवन कॅफे, मायाज लॉज येथे तसेच गहुंजे स्टेयीयम येथे घडला आहे. (Pune Crime News)

अनिल चौधरी, अमन शेख, हुसेन डांगे, मोहम्मद अहमेर मिर्झा असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. तर शंकर गोरडे, मुन्नास्वामी, देहुरोड पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक हेमंत गायकवाड, पोलीस शिपाई सचिन शेजाळ यांच्यावर आयपीसी 363, 384, 385, 120(ब), 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे. याबाबत वैभवसिंग मनिषकुमार सिंग चौहाण (वय-19 रा. बॉईज हॉस्टेल सिम्बायोसिस कॉलेज किवळे) याने देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्य़ाद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी चौहान हा तरुण किवळे येथील सिम्बायोसिस कॉलेज कॉलेजमध्ये शिकतो. तो कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहतो. देहुरोड पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अंमलदार आणि इतर आरोपींनी संगनमत करुन चौहान याच्याकडून पैसे उकळण्याचा कट रचला. त्यानुसार 10 फेब्रुवारी रोजी दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास कॉलेज जवळील सेवन कॅफे मधून अपहरण केले.

तेथून चौहान याला मायाज लॉज, गहुंजे स्टेडियम आणि तिथून देहुरोड पोलीस ठाण्यात आणले. चौहान याला गांजाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये घालण्याची धमकी दिली. कारवाई टाळायची असेल तर 20 लाख रुपयांची मागणी केली. पोलिसांसह इतर आरोपींनी धमकी दिल्याने घाबरलेल्या चौहान याने त्याच्या बँक खात्यातून वेगवेगळ्या बँक खात्यावर गुगल पे व नेट बँकींगद्वारे 4 लाख 98 रुपये देण्यास भाग पाडल्याचे फिर्यादीत नमूद केले. पुढील तपास देहूरोड विभागाचे सहायक पोलीस आयुक्त मुगुट पाटील हे करीत आहेत.

Pune Hadapsar Crime | पुण्यात सहायक पोलीस आयुक्तांच्या (ACP) मुलाच्या दुकानातून 2 कोटींचे सोने पळवले

Pune Bibvewadi Crime | जुन्या भांडणाच्या कारणावरुन टोळक्याचा कोयत्याने तरुणावर वार; बिबवेवाडीत पसरवली दहशत

Pune Lonikand Crime | तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; बांधकाम व्यावसायिकासह 15 जणांवर गुन्हा दाखल

Senior Journalist Digambar Darade | पत्रकार दिगंबर दराडेंचं ‘ऋषी सुनक’ व ‘सुंदर पिचाई’ वर्ल्ड बुक फेअरमध्ये

Pune Crime News | व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला मजनूने ब्लेडने स्वत:ला केले जखमी; अल्पवयीन मुलीने नकार दिल्याने केले कृत्य

Leave A Reply

Your email address will not be published.