Pune Hadapsar Crime | पुण्यात सहायक पोलीस आयुक्तांच्या (ACP) मुलाच्या दुकानातून 2 कोटींचे सोने पळवले

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Hadapsar Crime | दुकानावर इन्कम टॅक्स विभागाची रेड (Income Tax Raid) पडणार असल्याचे सांगून सहायक पोलीस आयुक्त यांच्या मुलाच्या दुकानातील (Shop Of ACP’s Son) व्यवस्थापकाने 5 किलो सोने व 50 किलो चांदी आणि रोकड असा एकूण 2 कोटी 27 लाखांचा ऐवज पळवून नेल्याची घटना हडपसर भागात घडली आहे. ही घटना 12 मार्च 2022 ते 8 फेब्रुवारी 2024 या कालावधीत घडली आहे.

याप्रकरणी व्यवस्थापक विनोद रमेश कुलकर्णी Vinod Ramesh Kulkarni (वय-35 रा. लोणी काळभोर – Loni Kalbhor) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत ज्योतीरादित्य उर्फ यश राजेंद्र मोकाशी Jyotiraditya alias Yash Rajendra Mokashi (वय-22 रा. निलगीरी लेन, बाणेर रोड, औंध) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी दोन वर्षांपूर्वी माळवाडी रोड हडपसर येथील शिवनेरी बिल्डिंग मध्ये वसुंधरा ज्वेलर्स नावाचे सोने, चांदी दागिने विक्रीचे दुकान सुरु केले होते. या दुकानात व्यवस्थापक म्हणून विनोद कुलकर्णी याची नेमणूक केली होती. (Pune Hadapsar Crime )

वसुंधरा ज्वेलर्स दुकानामध्ये 5 किलो सोने, 85 किलो चांदी अशी भांडवली गुंतवणूक फिर्यादी यांनी नातेवाईक आणि मित्रांकडून घेऊन केली होती. दरम्यान, फिर्यादी एमएस चे शिक्षण घेण्यासाठी लंडन येथे निघून गेले होते. त्यावेळी संपूर्ण दुकानाची जबाबदारी व्यवस्थापक विनोद कुलकर्णी याच्याकडे होती. फिर्याद ज्योतिरादित्य मोकाशी हे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर डिसेंबर 2023 मध्ये पुण्यात आले. त्यानंतर त्यांनी दुकानाचे कामकाज पाहण्यास सुरुवात केली.

दुकानाबाबत व्यवस्थापक कुलकर्णी व इतर कर्मचाऱ्यांकडून माहिती घेत असताना मोकाशी यांच्या लक्षात आले की,
दुकान सुरु करताना 5 किलो सोने व 85 किलो चांदी घेतली होती. त्यापैकी पावणे तीन किलो सोने व 50 किलो चांदी
कमी आहे. यानंतर मोकाशी यांनी ही बाब वडिल राजेंद्र मोकाशी यांना सांगितली. वडिलांनी सोने, चांदी कमी असल्याबाबत कुलकर्णी याच्याकडे चौकशी केली असता त्याने 7 फेब्रुवारी रोजी सर्व सोने परत देतो व हिशोब पूर्ण करतो असे सांगून निघून गेला.

यानंतर 8 फेब्रुवारी रोजी विनोद कुलकर्णी याने सकाळी दहाच्या सुमारास दुकानातील एका कामगाराला फोन करुन
सांगितले की, दुकानावर इन्कम टॅक्सची रेड पडणार आहे व मालकाला हिशोब द्यायचा आहे. त्यासाठी सोने, चांदी तयार ठेव.
यानंतर काही वेळाने एक गाडी आली. कामगाराने दुकानातील सर्व सोने, चांदी दिली. आणि विनोद याने सांगितल्या प्रमाणे दुकान बंद केले. व्यवस्थापक कुलकर्णी याच्याकडे सोपवण्यात आलेले पाच किलो सोने, 85 किलो चांदी आणि रोख रक्कम अशी दोन कोटी 27 लाखांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक महेश कवळे करीत आहेत.

Pune Bibvewadi Crime | जुन्या भांडणाच्या कारणावरुन टोळक्याचा कोयत्याने तरुणावर वार; बिबवेवाडीत पसरवली दहशत

Pune Lonikand Crime | तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; बांधकाम व्यावसायिकासह 15 जणांवर गुन्हा दाखल

Senior Journalist Digambar Darade | पत्रकार दिगंबर दराडेंचं ‘ऋषी सुनक’ व ‘सुंदर पिचाई’ वर्ल्ड बुक फेअरमध्ये

Pune Crime News | व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला मजनूने ब्लेडने स्वत:ला केले जखमी; अल्पवयीन मुलीने नकार दिल्याने केले कृत्य

Leave A Reply

Your email address will not be published.