Pune Bibvewadi Crime | जुन्या भांडणाच्या कारणावरुन टोळक्याचा कोयत्याने तरुणावर वार; बिबवेवाडीत पसरवली दहशत

marhan

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Bibvewadi Crime | जुन्या भांडणाच्या कारणावरुन टोळक्याने तरुणावर कोयत्याने वार करुन त्याला जबर जखमी केले. मदतीसाठी येत असलेल्या लोकांना कोयत्याचा धाक दाखवून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार अप्पर बिबवेवाडी येथील संविधान चौकात मंगळवारी मध्यरात्री २ वाजता घडला. (Pune Bibvewadi Crime )

याबाबत दीपक महादेव रणदिवे (वय १८, रा. राजीव गांधीनगर, अप्पर बिबवेवाडी) याने बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibvewadi Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ३४/२४) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी ओंकार भिसे, राजू प्रल्हाद गुळबिळे, प्रणव अमित गडदे, रोहन अभंग (सर्व रा. अप्पर इंदिरानगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी व आरोपी हे ओळखीचे आहेत. फिर्यादी व त्यांचा मित्र प्रथमेशा जानराव हे दोघे ओंकार अनिल शिंदे याला घरी सोडून येत होते. त्यावेळी आरोपी मोटारसायकलवरुन संविधान चौकात आले. त्यांनी फिर्यादी व त्याच्या मित्राला थांबविले. जुन्या भांडणाचे कारणावरुन तुम्हाला जास्त मस्ती आली का असे म्हणून फिर्यादी यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. हातातील लोखंडी हत्यारे उलटे करुन फिर्यादीच्या उजव्या हातावर, पायाचे मांडीवर, नडगीवर, पोटावर पाठीवर, डोक्यावर मारुन जबर जखमी केले.

फिर्यादीच्या मित्रालाही मारहाण केली. ही घटना कोणाला सांगितली तर तुम्हाला जीवे मारु अशी धमकी दिली. त्यावेळी त्या ठिकाणी असणारे घरातील काही लोक आवाज ऐकून मदतीकरीता येत असताना आरोपींनी हातातील हत्यारे हवेत फिरवून कोणी मध्ये आला तर एकेकाला खल्लास करुन टाकीन अशी धमकी देऊन दहशत पसरवली. सहायक पोलीस निरीक्षक शिल्पा लंबे तपास करीत आहेत.

Senior Journalist Digambar Darade | पत्रकार दिगंबर दराडेंचं ‘ऋषी सुनक’ व ‘सुंदर पिचाई’ वर्ल्ड बुक फेअरमध्ये

Pune Crime News | व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला मजनूने ब्लेडने स्वत:ला केले जखमी; अल्पवयीन मुलीने नकार दिल्याने केले कृत्य

Shrimant Bhausaheb Rangari Ganpati : श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट’तर्फे गणेश जयंती उत्साहात