Pune Sahakar Nagar Police | व्यसनाच्या आहारी गेलेल्या उच्च शिक्षीत वाहन चोराला सहकारनगर पोलिसांकडून अटक, तीन दुचाकी जप्त

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Sahakar Nagar Police | व्यसनाच्या आहारी गेलेल्या उच्च शिक्षीत इंटिरिअर डिझायनींगचा डिप्लोमा केलेल्या तरुणाला वाहन चोरीच्या गुन्ह्यात सहकारनगर पोलिसांनी अटक केली आहे. अटक केलेल्या आरोपीकडून दोन लाख रुपये किंमतीच्या तीन दुचाकी जप्त करुन तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. ही कारवाई 11 फेब्रुवारी रोजी धनकवडी येथील सावरकर चौकात केली. (Pune Sahakar Nagar Police)

प्रशांत प्रभाकर कान्हेकर (वय-47 रा. साहील सोसायटी, फ्लॅट नं.1, बिबवेवाडी, पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सहकारनगर पोलीस ठाण्यातील तपास पथकातील अधिकारी व कर्मचारी हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार अमोल पवार व विशाल वाघ यांना माहिती मिळाली की, एक व्यक्ती चोरीची काळ्या रंगाची अॅक्टीव्हा (एमएच 12 एफई 4596) गाडी घेऊन धनकवडी येथील सावरकर चौकात थांबला आहे.

पोलीस सावरकर चौकात गेले असता आरोपी दुचाकीवरुन जाताना दिसला. पथकाने त्याचा पाठलाग करुन ताब्यात घेतले. त्याच्याकडे असलेल्या दुचाकीबाबत चौकशी केली असता, ही गाडी पुणे-सातारा रोडवरील डी-मार्ट येथून 8 फेब्रुवारी रोजी दुपारी दीडच्या सुमारास चोरल्याचे कबुल केले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याच्याकडून एक लाख 95 हजार रुपयांची तीन वाहने जप्त करुन सहकारनगर पोलीस ठाण्यात दाखल असलेले तीन वाहन चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपीवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambaug Police Station) वाहन चोरीचा गुन्हा दाखल आहे.

ही कामगीरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशीक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त परिमंडळ-2 स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त नंदिनी वग्यानी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक बापु खुटवड, पोलीस अंमलदार अमोल पवार, महेश मंडलिक, विशाल वाघ, बजरंग पवार, निलेश शिवतारे, सागर सुतकर, सागर कुंभार, नवनाथ शिंदे यांच्या पथकाने केली.

Pune Crime News | पुणे: कॉलेज तरुणाला गांजाच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी ! पोलिसांनीच उकळली 5 लाखांची खंडणी; पोलीस नाईक हेमंत गायकवाड, पोलीस शिपाई सचिन शेजाळ यांच्यावर FIR (Video)

Pune Hadapsar Crime | पुण्यात सहायक पोलीस आयुक्तांच्या (ACP) मुलाच्या दुकानातून 2 कोटींचे सोने पळवले

Pune Bibvewadi Crime | जुन्या भांडणाच्या कारणावरुन टोळक्याचा कोयत्याने तरुणावर वार; बिबवेवाडीत पसरवली दहशत

Pune Lonikand Crime | तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न; बांधकाम व्यावसायिकासह 15 जणांवर गुन्हा दाखल

Senior Journalist Digambar Darade | पत्रकार दिगंबर दराडेंचं ‘ऋषी सुनक’ व ‘सुंदर पिचाई’ वर्ल्ड बुक फेअरमध्ये

Pune Crime News | व्हॅलेंटाईन डेच्या पूर्वसंध्येला मजनूने ब्लेडने स्वत:ला केले जखमी; अल्पवयीन मुलीने नकार दिल्याने केले कृत्य

Leave A Reply

Your email address will not be published.