Pune Crime News | पुणे : पत्नी नांदायला येत नाही, अंगावर पेट्रोल ओतून पोलीस चौकीत पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

0

पुणे : – Pune Crime News | आई-वडिलांच्या सांगण्यावरुन पत्नी नांदायला येत नसल्याच्या कारणावरुन संतप्त झालेल्या पतीने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला (Suicide Attempt). हा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि.1) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास महात्मा फुले पोलीस चौकीत (Mahatma Phule Police Chowki) घडला आहे.

याबाबत पोलीस शिपाई मुकेश अशोक पानपाटील (वय-31) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात (Chandan Nagar Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरुन नवनाथ कचरु लोखंडे (वय-26 रा. डोमखेल रोड, वाघोली) याच्यावर आयपीसी 309 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवनाथच्या पत्नीला तिचे आई-वडील त्याच्याबद्दल काहीही सांगत होते. त्यामुळे पत्नी त्याला सोडून माहेरी राहायला आली होती. नवनाथ याने तिला नांदण्यास येण्यासाठी सांगितले मात्र ती नांदायला येत नव्हती. याचा राग नवनाथ याच्या मनात होता. बुधवारी सकाळी तो याचा जाब विचारण्यासाठी सासुरवाडीला आला होता. मात्र, घरी कोणी नसल्याने त्याने पत्नीला फोन करुन विचारले. त्यावेळ तिने महात्मा फुले पोलीस चौकीत असल्याचे नवनाथला सांगितले.

नवनाथ पोलीस चौकीत गेला. पोलीस चौकीत जाताने त्याने एका प्लास्टीकच्या बॉटलमध्ये पेट्रोल घेऊन गेला. त्याठिकाणी नवनाथ याने स्वत:च्या अंगावर पेट्रोल ओतुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार पोलीस चौकीत असलेल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी नवनाथला आडवले. पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.