Pune Police News | पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार शहरातील प्रत्येक पोलीस स्टेशन, पोलीस चौकीत अट्टल गुन्हेगारांची परेड (Videos)

0

पुणे : पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar) यांनी पदभार स्वीकारल्यानंतर शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्याचा विडा उचलला आहे. सध्या सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकांच्या (Pune Lok Sabha Election 2024) आणि शहरात वाढत असलेल्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्तांनी शहरातील अट्टल गुन्हेगारांची (Criminals On Pune Police Record) परेड घेण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील नामचीन गुंडांना पोलीस आयुक्तालयात बोलावून घेत त्यांची परेड घेऊन इशारा दिला होता. त्यानंतर आता पोलीस आयुक्तांनी पोलीस स्टेशन आणि पोलीस चौकी स्तरावर गुन्हेगारांची परेड घेण्यास सुरुवात केली आहे. (Pune Police Parade Notorious Criminals)

पुण्यात फोफावणारी गुन्हेगारी, वर्चस्व वाद आणि टोळीयुद्ध या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमितेश कुमार कामाला लागले आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशानुसार लोकसभा निवडणुकीच्या पार्शभूमीवर पुण्यातील सर्वच पोलीस स्टेशन आणि पोलीस चौक्यामध्ये स्थानिक गुन्हेगारांची ‘परेड’ घेण्यात येत आहे. गुरुवारी शहरातील सर्वच पोलीस स्टेशन आणि पोलीस चौकीमध्ये स्थानिक गुन्हेगारांची हजेरी घेण्यात आली.

हाणामारी, दहशत पसरवणे, बेकायदा जमाव जमवणे, बेकायदेशीर शस्त्र बाळगणे असे गुन्हे दाखल असलेल्या गुन्हेगारांची परेड घेण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले होते. त्यानुसार पुणे शहरातील सर्व पोलीस स्टेशन आणि पोलीस चौकीमध्ये हद्दीतील सराईत गुन्हेगारांना बोलावून घेत त्यांची कानउघडणी करण्यात आली. या गुन्हेगारांना कोणत्याही प्रकारचा उपद्रव अथवा बेकायदा कृती न करण्याची तंबी देण्यात आली. तसेच ज्या ज्या वेळी चौकशीसाठी किंवा हजेरीसाठी बोलवण्यात येईल त्यावेळी यावे लागेल, अशी सक्त ताकीद देण्यात आली.

काही दिवसांपूर्वी आयुक्त अमितेश कुमार यांच्या आदेशावरुन 200 ते 300 कुख्यात गुन्हेगारांची ओळख परेड काढण्यात आली. यामध्ये गजा मारणे, नीरज घायवळ यासारख्या नामचीन गुंडांचा देखील समावेश होता. एरवी मस्तीत वारणारे हे गुंड पोलीस आयुक्तालयात अज्ञाधारक विद्यार्थ्यांप्रमाणे माना खाली घालून एका लाईनमध्ये उभे होते. लहान असो वा मोठा कोणाताच गुन्हा करायचा नाही, गुन्हा केला तर थेट आतमध्ये घेऊ, अशा शब्दात पोलिसांनी या गुंडांना समज दिली होती. दरम्यान, बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर पोलीस आयुक्तांनी पुण्यातील 100 हून अधिक ‘बंदूकबाजां’ना आयुक्तलयात बोलून त्यांची हजेरी घेतली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.