Pune Crime News | अश्लील मेसेज करुन महिलेचा विनयभंग, सहकारनगर मधील घटना

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | कंपनीच्या केटरींग स्टाफमधील एकाने ज्येष्ठ महिलेला अश्लील टेक्स्ट मेसेज (Obscene Text Messages) करुन विनयभंग (Molestation) केल्याची प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी उत्तर प्रदेशातील एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार गुरुवारी (दि.7) सायंकाळी पावणे सातच्या सुमारास महिलेच्या राहत्या घरी घडला आहे. (Pune Crime News)
याबाबत सहकारनगर येथे राहणाऱ्या 65 वर्षीय महिलेने पर्वती पोलीस ठाण्यात (Parvati Police Station) शुक्रवारी फिर्य़ाद दिली आहे. पोलिसांनी सचिन दिलीप वर्मा/सोनी (रा. मु.पो. देवगाह, उत्तर प्रदेश) याच्यावर आयपीसी 509 नुसार गुन्हा (FIR) दाखल केला आहे. (Pune Crime News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी महिलेचे आयएसजी हॉस्पिटॅलिटी प्रा. लि. (ISG Hospitality Pvt. Ltd.)
नावाची कंपनी आहे. त्यांनी गोवा येथील वेदांता कंपनीमध्ये (Vedanta Company Goa) काम घेतले आहे.
आरोपी सचिन वर्मा हा त्याच्या कंपनीच्या केटरींग स्टाफमधील कर्मचारी आहे.
गुरुवारी सायंकाळी फिर्य़ादी या त्यांच्या घरी असताना मोबाइलवर टेक्स मेसेज आला.
आरोपीने महिलेला अश्लील टेक्स मेसेज करुन त्यांच्या स्त्री मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले.
पुढील तपास पोलीस निरीक्षक निकाळजे (PI Nikalje) करीत आहेत.
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
हे देखील वाचा
- Pune Police MPDA Action | उत्तमनगर परिसरातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 66 वी स्थानबध्दतेची कारवाई
- Pune To Lonavala Railway Mega Block | लोकलने प्रवास करायचाय अगोदर ब्लॉक पाहून घ्या; ब्लॉकमुळे पुणे लोणावळा दरम्यान 14 लोकल रद्द
- Pune Crime News | इंन्स्टाग्रामवर ओळख करुन महिलेवर बलात्कार, व्हिडिओ व्हायरल करुन केली बदनामी; पुण्यातील धक्कादायक प्रकार
- Pune Crime News | व्हिडिओ कॉलवर बोलत असताना काढले अश्लील फोटो, व्हायरल करुन केला विनयभंग; पुण्यातील प्रकार
- न्यूड फोटो व व्हिडिओ पाठवून दोन महिलांचा विनयभंग, तरुणावर गुन्हा दाखल; कर्वेनगर मधील प्रकार
- ISIS Terror Conspiracy Case | पुण्यासह देशभरातील 44 ठिकाणी एनआयएचे छापे; 13 स्लिपर सेलना घेतले ताब्यात