Surendra Kumar Agarwal Arrest | पोर्शे अपघात प्रकरणात पुणे पोलिसांची मोठी कारवाई ! अल्पवयीन आरोपीच्या आजोबांनाही अटक, ड्रायव्हरला डांबून ठेवले, धमकी दिली

0

पुणे : Surendra Kumar Agarwal Arrest | पुणे पोर्शे कार अपघातात (Porsche Car Accident Pune) पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे (Kalyani Nagar Accident) . काल पुणे पोलिसांनी (Pune Police) अल्पवयीन आरोपी सुरेंद्रकुमार अग्रवाल यांची दिर्घ चौकशी केली. यानंतर त्यांना अटक केली आहे. अपघातानंतर पळून आलेल्या ड्रायव्हरला धमकी देणे आणि डांबून ठेवल्याने पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.

देशभरातून संताप व्यक्त होत असल्याने तसेच विविध धक्कादायक खुलासे अग्रवाल कुटुंबियांबाबत होत असल्याने पुणे पोलिसांच्या कारवाईला वेग आला आहे. काल अल्पवयीन मुलाचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांची चौकशी करण्यात आली. या चौकशीत नातवाला आजोबांनी चावी दिल्याची कबुली दिली होती.

या चौकशीत आजोबा सतत नातू अल्पवयीन असल्याचे सांगत होते. दरम्यान, सुरेंद्रकुमार अग्रवाल यांचे छोटा राजनशी संबंध (Chhota Rajan) असून त्यातून त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा खटला देखील सुरु आहे. यासंबंधी देखील चौकशी सुरू आहे.

अपघात घडला तेव्हा अल्पवयीन मुलाच्या शेजारी ड्रायव्हर बसला होता. पोर्शे कारचा अपघात झाल्यानंतर अल्पवयीन आरोपी घटनास्थळावर स्थानिक नागरिकांच्या कचाट्यात सापडला. मात्र, इतर जण पळून गेले. अपघाता नंतर ड्रायव्हर गंगाराम पुजारी (Gangaram Pujari) अग्रवाल यांच्या घरी पोहचल्यानंतर सुरेंद्र कुमारने त्याला डांबून ठेवले. तसेच योग्य तो जबाब देऊ दिला नाही किंवा तसा प्रयत्न केला, असा गुन्हा दाखल केला आहे. आज त्यांना सुट्टीच्या न्यायालयासमोर दाखल करण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सुरेंद्र कुमार आणि विशाल या दोघांनी मिळून ड्रायव्हर गंगाराम पुजारीला दोन दिवस डांबून ठेवल्याचा आरोप आहे. यामुळे विशाल अग्रवालचा (Vishal Agarwal) ताबा पुन्हा पुणे पोलिस ताबा घेणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.