Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | घरात पैसे जास्त झाल्यावर अशी मस्ती सुचते; आमदार बच्चू कडू यांची संतप्त प्रतिक्रिया

0

पुणे: Bachchu Kadu Porsche Car Accident Pune | कल्याणीनगर येथील अपघातामुळे दोन निष्पाप तरुणांचा जीव गेला. पोलिसांच्या कारवाईला (Pune Police) घेऊन अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले. त्यानंतर राजकारण चांगलेच तापले. (Kalyani Nagar Accident)

सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आता आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. न्यायालयाने अपघातातील अल्पवयीन मुलाला काही अटींच्या आधारे जामीन दिला होता. मात्र विविध स्तरातून रोष व्यक्त झाल्यानंतर पोलिसांनी कलमात वाढ करून संबंधित मुलाला पुन्हा कोर्टासमोर सादर केले असता कोर्टाने त्याला 14 दिवस बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश दिले.

या प्रकरणावरून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी राजीनामा द्यावा अशीही मागणी आता होत आहे. तर आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी पोलिसांनी पैसे खाऊन हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करीत पोलीस आयुक्तांच्या (Pune CP) बदलीची मागणीही केली आहे.

उपमुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष पोलीस आयुक्तालयात उपस्थित राहात पोलिसांना कारवाई बाबतच्या सूचना दिल्या. राहुल गांधी यांनाही समाजमाध्यमातून या घटनेला घेऊन टीका केली आहे.

या प्रकरणात उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) कुठे दिसत नव्हते मात्र काल त्यांनीही माध्यमांसमोर येत या अपघात प्रकरणात राजकीय हस्तक्षेप नसून पूर्ण पारदर्शकता असल्याचे वक्तव्य केले.

या प्रकरणात आता आमदार बच्चू कडू यांनीही उडी मारली आहे. ” घरात एवढा पैसा झाल्यावर रस्त्यावर अशी मस्ती येते. पैशामुळे असे लोभी लोक माणुसकी विसरत चालले आहेत. बेदरकारपणे गाडी चालवणे चुकीचे आहे. डान्सबार आणि पब मध्ये जाणारा वर्ग हा प्रचंड पैसेवाला आहे. शौकीन लोकं पैशामुळे माणुसकी विसरत आहेत.” अशी संतप्त प्रतिक्रिया त्यांनी दिली.

तसेच ज्याची मेहनत कमी त्यांना पगार जास्त आणि जास्त मेहनत त्याला कमी पगार अशी समाजात परिस्थिती असल्याचेही बच्चू कडू यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.