Pune To Lonavala Railway Mega Block | लोकलने प्रवास करायचाय अगोदर ब्लॉक पाहून घ्या; ब्लॉकमुळे पुणे लोणावळा दरम्यान 14 लोकल रद्द

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune to Lonavala Railway Mega Block | रेल्वे मार्गाच्या दुरुस्ती व देखभालीसाठी पुणे ते लोणावळा दरम्यान मध्य रेल्वेने (Central Railway) ब्लॉक (Pune to Lonavala Railway Mega Block) घेतला आहे. त्यामुळे रविवारी सकाळी १० ते रात्री साडेसात वाजेपर्यंत पुणे ते लोणावळा दरम्यानच्या १४ लोकल रद्द (Pune to Lonavala Local Cancellation) करण्यात आल्या आहेत.

पुण्याहून लोणावळ्यासाठी सुटणारी लोकल क्रमांक (०१५६२) वेळ ९.५७, लोकल क्रमांक (०१५६४) वेळ ११.१७, लोकल क्रमांक (०१५६८) वेळ १५.०० तसेच लोकल क्रमांक (०१५७२) वेळ १८.०२ या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच शिवाजीनगर लोणावळा करीता सुटणारी लोकल क्रमांक (०१५७०) वेळ १७.२० तसेच शिवाजीनगरहून तळेगावकरीता सुटणारी लोकल क्रमांक (०१५८८) वेळ १५.४७ या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. (Pune to Lonavala Railway Mega Block)

लोणावळ्याहून पुणे करीता येणार्‍या काही लोकल रद्द करण्यात आल्या आहेत. लोणावळ्याहून पुण्याकरीता येणारी
लोकल क्रमांक (०१६१) वेळ १४.५० आणि लोकल क्रमांक (०१५७१)वेळ १९.३५ या लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.
लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता लोकल क्रमांक (०१५५९) वेळ १०.०५, लोकल क्रमांक (०१५६५) वेळ १७.३०,
तसेच लोकल क्रमांक (०१५६७) वेळ १८.०८ या लोकल रद्द केल्या आहेत. तसेच तलेगावहून पुणे करीता येणारी लोकल क्रमांक (०१५८९) वेळ १६.४० रद्द केली आहे.

चेन्नई ते लोकमान्य टिळक टर्मिनस (Chennai to Lokmanya Tilak Terminus) मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस
Mumbai Superfast Express(गाडी क्रमांक १२१६४) ही साडेतीन तास उशिराने धावणार आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.