ISIS Terror Conspiracy Case | पुण्यासह देशभरातील 44 ठिकाणी एनआयएचे छापे; 13 स्लिपर सेलना घेतले ताब्यात

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – ISIS Terror Conspiracy Case | इसिसच्या पुणे मॉड्युलच्या (Pune ISIS Module Case) प्रकरणात राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीने National Investigation Agency (NIA) देशभरातील ४४ ठिकाणी शनिवार सकाळपासून छापेमारी सुरु केली आहे. (ISIS Terror Conspiracy Case)
इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरीया या बंदी घातलेल्या संघटनेची विचारधारा पसरविण्याचा प्रयत्न करणार्या स्लिपर सेलवर एनआयएने आपली करडी नजर वळविली आहे. (ISIS Terror Conspiracy Case)
https://x.com/ANI/status/1733314054326997011?s=20
देशभरात विविध शहरांमध्ये बॉॅम्बस्फोट घडविण्यापासून धार्मिक दोष परविण्याचा प्रयत्न इसिस या स्लिपर सेलच्या माध्यमातून करत होती. पुण्यात सापडलेल्या दहशतवादीचा तपास करताना हा इसिसचा प्लॅन उघडकीस आला होता. त्यातून एनआयएने गेल्या काही दिवसांमध्ये पुणे, पडसासह मध्यप्रदेश, राजस्थान, झारखंड, दिल्लीत छापे घालून अनेकांना पकडले होते. त्यांच्याकडे सापडलेली कागदपत्रे, त्याचा इतरांशी असलेल्या संपर्कातून आज देशभरातील ४४ ठिकाणी एनआयएने छापेमारी केली आहे. (Maharashtra ISIS Module Case)
पुण्यामध्ये दोन ठिकाणी पहाटेपासूनच छापे घालण्यात येत आहे.
याशिवाय पडघा येथून काही जणांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कर्नाटकात ही छापेमारी करण्यात आली आहे.
त्यात पुणे शहरात दोन ठिकाणी, ठाणे शहरात 9 ठिकाणी, भाइंदरमध्ये एका ठिकाणी तर ठाणे ग्रामीण भागात छापे
घालण्यात आले आहेत. या सर्व ठिकाणी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाच्या मदतीने शोध घेतला जात आहे.
आतापर्यंत 13 जणांना ताब्यात घेतल्याचे सांगण्यात येत आहे.
- विश्रांतवाडी परिसरातील अट्टल गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई! पोलीस आयुक्त रितेश कुमार यांच्याकडून 65 वी स्थानबध्दतेची कारवाई
- लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार; कोथरुड परिसरातील प्रकार
- तळवडे परिसरातील फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग, सहा महिलांचा होरपळून मृत्यू, 8 जण गंभीर
- विवाहितेच्या आत्महत्ये प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल, पुण्यातील घटना
- पुण्यातील अधिकारी सातार्यात अँटी करप्शनच्या जाळ्यात; कामगार विभागाच्या उपसंचालक मागतात ३० टक्के कमिशन