Pune Crime News | व्हिडिओ कॉलवर बोलत असताना काढले अश्लील फोटो, व्हायरल करुन केला विनयभंग; पुण्यातील प्रकार

0

पुणे : एन पी न्यूज 24 ऑनलाइन – Pune Crime News | व्हिडिओ कॉलवर बोलत असताना मैत्रिणीचे अश्लील फोटो (Obscene Photos) काढून ते व्हायरल करुन विनयभंग (Molestation Case) केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बिहार येथील मित्रावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार नोव्हेंबर 2023 ते 7 डिसेंबर 2023 या दरम्यान घडला आहे. (Pune Crime News)

याबाबत पिडित महिलेने चतु:शृंगी पोलीस ठाण्यात (Chaturshringi Police Station) शुक्रवारी (दि.8) फिर्याद दिली आहे. यावरुन अंकित राजेश पांडे Ankit Rajesh Pandey (वय-26 रा. गोरखपुर, बिहार) याच्यावर आयपीसी 354क, 354छ, 506 सह आयटी अॅक्ट (IT Act) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी आणि आरोपी हे एकमेकांचे मित्र आहेत. फिर्य़ादी त्याला भेटत असताना तसेच व्हिडिओ कॉलवर बोलत असताना आरोपी अंकित याने तरुणीच्या नकळत तिचे अश्लील स्क्रिन शॉट काढले. दरम्यान, आरोपीने त्याच्या कुटुंबियांची खोटी माहिती दिल्याने फिर्य़ादी यांनी त्याच्यासोबत बोलणे सोडून दिले होते. यानंतर अंकित याने लिंकडीन (Linkedin) या अॅपवरुन फिर्य़ादी यांचे अश्लील फोटो शेअर केले.

तसेच तिच्या ऑफिसच्या मेल आयडीवर फोटो पाठले.
आरोपी एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने तरुणीच्या गुगल पे
तसेच वेगवेगळ्या सोशल मीडियावर तिला फॉलो करुन अश्लिल फोटो व व्हिडिओ व्हायरल करुन विनयभंग केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक गुन्हे जगन्नाथ जानकर (PI Jagannath Jankar) करीत आहेत. (Pune Crime News)

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Leave A Reply

Your email address will not be published.