PMC Action On Pubs In Pune | महापालिकेने ‘शहरभर’ हॉटेल्स, रेस्टॉरंटमधील अतिक्रमणांवर कारवाई सुरू केली; वारंवार अतिक्रमण करणार्‍या मुंढवा, घोरपडीतील पब्ज व हॉटेल्स चालकांवर गुन्हे दाखल

0

पुणे : PMC Action On Pubs In Pune | महापालिकेच्या बांधकाम विभागाने शहरातील हॉटेल्स, पब्ज आणि रेस्टॉरंटमध्ये करण्यात आलेल्या अतिक्रमण कारवाईला अधिकची गती दिली आहे. केवळ उपनगरांमधील हॉटेल्सवर कारवाई न करता आज नळस्टॉप आणि टिळक चौकातील हॉटेल्सवरही कारवाई करण्यात आली. तसेच मुंढवा व परिसरात दोन दिवसांपुर्वी कारवाई करण्यात आलेल्या हॉटेल्स व पब्ज चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कल्याणीनगर येथील अपघात प्रकरणामुळे ‘पुणे’ राजकिय आणि सामाजिकदृष्टया हॉट ठरले आहे. नागरिकांसोबतच विरोधी पक्षांनी देखिल हे प्रकरण उचलून धरल्याने पोलिस, महापालिका, राज्य उत्पादन शुल्क आणि जिल्हा प्रशासन देखिल कामाला लागले आहे. मागील सहा दिवसांत राज्य उत्पादन शुल्क विभागाने अल्पवयीन मुलांना दारू देणे, वेळ मर्यादा न पाळणे आदी कारणास्तव पुण्यासह जिल्ह्यातील तब्बल ३२ हून अधिक हॉटेल्स, पब्जचे लायसन्स स्थगित केले आहे. तर महापालिकेने देखिल बेकायदा आणि अतिक्रमण केलेली रुफटॉप हॉटेल्स, पब्ज, रेस्टॉरंटविरोधात कारवाईची मोहीम उघडली आहे. बुधवारी एका दिवसांत विशेष मोहीम राबवून ४० हॉटेल्स आणि पब्जसह व्यावसायीक आस्थांपनांनी केलेले बेकायदा अतिक्रमण काढून टाकण्यात आले. तर आजही कर्वे रस्त्यावरील नळस्टॉप परिसरात पहाटेपर्यंत उघड्या असलेल्या हॉटेल्ससोबतच १४ आस्थापनांवर कारवाई करण्यात आली. आज झालेल्या कारवाईमध्ये १५ हजार ९२५ चौ.फूट क्षेत्र रिकामे करण्यात आले आहे महापालिकेने बुधवारी मुंढवा आणि परिसरातील ज्या पब्ज आणि हॉटेलवर अतिक्रमण कारवाई केली, त्यापैकी काही पब्ज चालकांवर आज गुन्हे नोंदविले आहेत. यामध्ये मुंढवा येथील वॉटर्स, ओरीला, अनवाईंड, हिंगोणे, कार्निवल, बॉटल फॉरेस्ट, मासा व चिलीज तसेच घोरपडी येथील ओ बार, पेंटाहाउस, स्पाईस फॅक्टरी व आकारी हॉटेल्सचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.