Baramati Pune Court Crime News | बारामती: लाच प्रकरणी ग्रामसेवक दीपाली कुतवळला पाच वर्षांची शिक्षा

0

बारामती : Baramati Pune Court Crime News | घरकुल आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २०१७ मध्ये गुन्हा दाखल केला होता. दीपाली जगन्नाथ कुतवळ
Deepali Jagannath Kutwal (वय ३७) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता . यामध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम , सन १९८८ चे कलम ७ , १३ (१) (ड) सह १३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला होता. (ACB Trap On Deepali Kutwal)

यामध्ये बारामती पंचायत समिती कार्यालयात ग्रामसेवक पदावर असताना घरकुल आवास योजने अंतर्गत घरकुल मंजूर करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्वीकारण्यात आली होती. हा गुन्हा २८/०२/२०१७ रोजी दाखल करण्यात आला होता. (Bribe Case)

या गुन्हाचा तपास पोलीस निरीक्षक श्रीमती अर्चना दौंडकर यांनी केला. या प्रकरणाबाबत बारामती न्यायालयात सुनावणी सुरु होती. सबळ पुराव्याच्या आधारे न्यायालयाने पाच वर्षे शिक्षेसह २५००० रुपयाच्या दंडाची शिक्षा सुनावली. तसेच दंड न भरल्यास वाढीव सहा महिन्याची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणाबाबत शासनाच्या वतीने सरकारी वकील म्हणून कल्पना नाईक यांनी कामकाज पाहीले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.