Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, पुणेकरांना केले आवाहन, अग्रवाल कुटुंबियांबद्दल काही तक्रार असल्यास…

0

पुणे : Porsche Car Accident Pune | पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. या प्रकरणात वरिष्ठांना माहिती न देणारे पोलीस निरीक्षक राहुल जगदाळे (PI Rahul Jagdale) आणि API विश्वनाथ तोडकरी (API Vishwanath Todkari) या दोन अधिकाऱ्यांचे निलंबन केल्यानंतर आता हा तपास गुन्हे शाखेकडे (Pune Crime Branch) देण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी या प्रकरणात पुणेकरांना आवाहन केले आहे. विशाल अग्रवाल ( Vishal Agarwal) आणि त्याच्या कुटुंबियासंदर्भात काही तक्रार असल्यास पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. (Kalyani Nagar Accident)

पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार (Pune CP Amitesh Kumar) यांनी येरवडा पोलीस ठाण्यातील (Yerawada Police Station) दोन अधिकाऱ्यांचे निलंबन केल्यानंतर अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडे हा तपास दिला आहे.

सहायक पोलिस आयुक्त आरती बनसोडे (ACP Arti Bansode) यांच्याकडून तपास काढून घेण्यात आला आहे. गुन्ह्याची व्याप्ती वाढल्यामुळे तसेच येरवडा पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय निर्माण झाल्यामुळे पोलीस आयुक्तांनी हा निर्णय घेतला.

दरम्यान, अग्रवाल कुटुंबियांच्या विरोधात अनेक तक्रारी पुणे पोलिसांना प्राप्त झाल्याने या सर्व तक्रारींचा तपास पुणे पोलीस करण्याची शक्यता आहे. यासाठी पुणे पोलिसांनी अग्रवाल कुटुंबियांबाबत पुणेकरांना एक आवाहन केले आहे. कुठल्या ही नागरिकाला अग्रवाल कुटुंबियासंदर्भात तक्रार दाखल करायची असेल तर त्याने पोलीस ठाणे किंवा गुन्हे शाखेला तक्रार द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

दरम्यान, अनधिकृत हॉटेल आणि पबवर (Pubs In Pune) देखील प्रशासनाकडून जोरदार कारवाई अद्याप सुरूच आहे. पुणे शहरात आणखीन १७ बार आणि पब्सवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने कारवाई करत बारचे परवाने निलंबित केले आहेत. ४ दिवसांत एकूण ४९ बार आणि पबचे परवाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने (Excise Department Pune) निलंबित केले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.