Medha Patkar | सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर मानहानीच्या खटल्यात दोषी; 24 वर्षे जुन्या खटल्यात दिल्लीच्या साकेत न्यायालयाचा निर्णय

0

Medha Patkar | नर्मदा बचाव आंदोलनाच्या (Narmada Bachao Andolan) नेत्या मेधा पाटकर यांना चोवीस वर्षे जुन्या असलेल्या मानहानी प्रकरणाबाबत न्यायालयाने दोषी ठरवले आहे. दिल्लीतील साकेत कोर्टाने याबाबत निर्णय दिला आहे.

मेधा पाटकर यांना दोन वर्षांचा तुरुंगवास किंवा दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. व्ही के सक्सेना यांनी नर्मदा बचाव आंदोलन विरुद्ध जाहिराती प्रकाशित केल्याबद्दल पाटकर यांच्या विरोधात २००० साली तक्रार दाखल केली होती.

एका टीव्ही चॅनेल वर आपल्या विरोधात अपमानास्पद टिप्पणी केल्याबाबत तसेच बदनामीकारक प्रेस स्टेटमेंट जारी केल्याबाबत सक्सेना यांच्या तक्रारी वरून दोन खटलेही दाखल झाले होते.

सक्सेना हे एनजीओ नॅशनल कॉन्सिल फॉर सिव्हिल लिबर्टीचे प्रमुख होते. याबाबत त्यांनी अब्रुनुकसानीचा दावा पाटकर यांच्या विरोधात दाखल केला होता. यामध्ये तक्रारदाराच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचू शकतो याची जाणीव असताना पाटकर यांनी कृत्य केल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदविले आहे.

तसेच पाटकर यांनी सक्सेना यांना देशभक्त नसलेला आणि पळपुटा असे म्हंटले होते. तसेच हवाला गैरव्यवहारामध्ये त्यांचा हात असल्याचा आरोपही त्यांनी केला होता. मेधा पाटकरांच्या कृतीमुळे सक्सेना यांच्या विश्वासार्हतेला आणि प्रतिष्ठेला धोका पोहोचल्याचे निरीक्षण कोर्टाने नोंदविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.