Anti Corruption Bureau Pune | पुण्यात ‘वसुली’साठी ‘चंदननगर’च्या हवालदाराकडून रात्री उशिरा ‘तोडपाणी’ ! महिलेची तक्रार न घेण्यासाठी लाच घेणारा अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात; प्रचंड खळबळ

0

पुणे : एन पी न्यूज 24  – Anti Corruption Bureau Pune | महिलेची तक्रार न घेण्यासाठी 5 हजार रूपयांच्या लाचेची मागणी करून 2 हजाराची लाच (Bribe) घेणार्‍या चंदननगर पोलिस ठाण्यातील (Chandan Nagar Police Station) पोलिस हवालदारास अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकानं (Anti Corruption Bureau Pune) रंगेहाथ पकडलं आहे. तक्रार न घेण्यासाठी हवालदार चक्क लाचेची मागणी करीत असल्याचा प्रकार उघडकीस आल्यानं प्रचंड खळबळ उडाली आहे.

अनिल निवृत्ती होळकर Anil Nivruti Holkar (52) असे लाच घेणार्‍या पोलिस हवालदाराचे नाव आहे. होळकर हे सध्या चंदननगर पोलिस ठाण्यात कार्यरत आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी एका महिलेला 50 हजार रूपये उसने दिले होते. ते त्यांना परत मिळवून देण्यासाठी व त्या महिलेची कोणतीही तक्रार न घेण्यासाठी पोलिस हवालदार होळकर यांनी तक्रारदाराकडे 5 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 2 हजार रूपये लाच देण्याचे ठरले. दरम्यान, तक्रारदार यांची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी अ‍ॅन्टी करप्शन विभागाकडे तक्रार दिली. प्राप्त तक्रारीची पडताळणी करण्यात आली असता पोलिस हवालदार होळकर हे लाच मागत असल्याचे निष्पन्न झाले.

मंगळवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास अ‍ॅन्टी करप्शनच्या पथकाने सापळा रचला. त्यावेळी सरकारी पंचासमक्ष होळकर यांनी तक्रारदाराकडून 2 हजार रूपयाची लाच घेतली. त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.
पुणे अ‍ॅन्टी करप्शनचे पोलिस अधीक्षक राजेश बनसोडे (Pune ACB SP Rajesh Bansode),
अप्पर अधीक्षक सुरज गुरव (Addl SP Suraj Gurav), अप्पर अधीक्षक सुहास नाडगौडा
(Addl SP Suhas Nadgauda) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधिक्षक
विजयमाला पवार (DySP Vijaymala Pawar) , पोलिस हवालदार अंकुश माने,
अशफाक इनामदार, पोलिस अंमलदार शिल्पा तुपे, रियाज शेख, चालक दिपक दिवेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

 

Web Title : – Anti Corruption Bureau Pune | Anti Corruption Bureau Pune Arrested Police Havaldar Anil Nivruti Holkar of Chandan Nagar Police Station While Taking Bribe of 2000

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 34 हजारांपेक्षाही जास्त नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Saving & Investment Tips | सेव्हिंग आणि इन्व्हेस्टमेंटसाठी खुप उपयोगी आहेत ‘या’ 7 टिप्स, लाभ घेण्यासाठी जाणून घ्या

Supreme Court | भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन कायद्यानेच; ठाकरे सरकारचा सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद

Pune Crime | भाडेकरु तरुणाने केला घर मालकिणीवर बलात्कार, आरोपी तरुणावर FIR

Pune Crime | शास्त्री रस्त्यावर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थीनीचा विनयभंग, भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे खळबळ

Leave A Reply

Your email address will not be published.