Coronavirus in Maharashtra | राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 34 हजारांपेक्षाही जास्त नवे रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी
मुंबई : एन पी न्यूज 24 – राज्यात कोरोनाचा संसर्ग (Coronavirus in Maharashtra) मागील काही दिवसांपासून वाढत आहे. कोरोनाबाधितांचा आकडा झपाट्याने वाढत असल्याने सक्रिय रुग्णांची संख्या वाढली आहे. राज्यात काल नव्या कोरोना बाधितांची (Coronavirus in Maharashtra) संख्या 33 हजार 470 होती. तर आज हीच आकडेवारी थेट 34 हजारांच्या पार गेली आहे. राज्यात गेल्या 24 तासात तब्बल 34 हजार 424 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज 34 ओमायक्रॉनबाधित (Omaicron) रुग्णाची नोंद झालेली आहे.
COVID19 | 34,424 new cases & 22 deaths in Maharashtra today; Active case tally rises to 2,21,477. The number of Omicron cases in the state is 1,281 including 499 discharges pic.twitter.com/3wxca9tGYx
— ANI (@ANI) January 11, 2022
राज्यात आज 18 हजार 967 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात आजपर्यंत 66 लाख 21 हजार 070 रुग्णांनी कोरोनावर (Coronavirus in Maharashtra) मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 94.75 टक्के झाले आहे. राज्यात आज 22 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्यात आजपर्यंत 1 लाख 41 हजार 669 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यू दर (Fatality Rate) 2.02 टक्के झाला आहे.
राज्यात आजपर्यंत 7 कोटी 09 लाख 28 हजार 954 प्रयोगशाळा तपसण्या करण्यात आल्या आहेत.
यामध्ये 69 लाख 87 हजार 938 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. राज्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण 9.85 टक्के आहे.
सध्या 2 लाख 21 हजार 477 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
राज्यात 14 लाख 64 हजार 987 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये (Home Quarantine) आहेत. तर 3032 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये (Institutional Quarantine) आहेत.
Web Title :- Coronavirus in Maharashtra | More than 34,000 new corona patients in the last 24 hours in the state, find out other statistics
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Supreme Court | भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन कायद्यानेच; ठाकरे सरकारचा सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद
Pune Crime | भाडेकरु तरुणाने केला घर मालकिणीवर बलात्कार, आरोपी तरुणावर FIR
Solapur Crime | पोलीस निरीक्षकावर पुण्यानंतर सोलापूरमध्ये विनयभंगाचा दुसरा गुन्हा दाखल