Madha Lok Sabha | शरद पवारांचा माढ्यात महायुतीला दुसरा धक्का, करमाळ्याचे माजी आमदार नारायण पाटलांच्या हाती ‘तुतारी’

0

सोलापूर : Madha Lok Sabha | माढा लोकसभा मतदारसंघात शरद पवार (Sharad Pawar) यांनी वेगवेगळे राजकीय डावपेच सुरूवातीपासून टाकून महायुतीला चांगलेच धक्के दिले आहेत. पवारांनी सूत्रे फिरवल्यानंतर मोहिते पाटील (Mohite Patil Family) कुटुंबाने भाजपविरोधात (BJP) बंड करत शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला होता. त्यानंतर माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyashil Mohite Patil) यांना पवारांनी उमेदवारी दिली. आता शिंदेंच्या शिवसेनेचे (Shivsena Eknath Shinde) करमाळ्यातील (Karmala Vidhan Sabha) माजी आमदार नारायण पाटील (Narayan Patil Former MLA) यांना आपल्याकडे खेचण्यात शरद पवारांना यश आले आहे. नारायण पाटील यांनी आज पवारांच्या पक्षात प्रवेश केला आहे.

तत्पूर्वी, माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांचा मार्ग मोकळा करण्यासाठी लोकसभेसाठी इच्छुक असलेल्या अभयसिंह जगताप (Abhaysinh Jagtap) आणि शेकापचे अनिकेत देशमुख (Aniket Deshmukh) यांचे बंड थंड करण्यात देखील शरद पवारांना यश आले आहे. आता नारायण पाटील यांना पवारांनी गळाला लावून दूसरा मोठा धक्का महायुतीला (Mahayuti) दिला आहे.

करमाळ्याचे विद्यमान आमदार संजय शिंदे (MLA Sanjay Shinde) हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीसोबत आहेत. त्यामुळे नारायण पाटील यांनी शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. धैर्यशील मोहिते पाटलांच्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील प्रवेश सोहळ्यावेळी नारायण पाटील उपस्थित होते. त्यामुळे तेही पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असे म्हटले जात होते. अखेर या चर्चेवर आज शिक्कामोर्तब झाले.

माढा लोकसभा मतदारसंघात भाजपचे रणजितसिंह नाईक निंबाळकर (Ranjit Naik-Nimbalkar), राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील तसेच वंचितचे (Vanchit Bahujan Aghadi-VBA) रमेश बारसकर (Ramesh Baraskar) यांच्यात थेट लढत होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.