Pune Crime | शास्त्री रस्त्यावर स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थीनीचा विनयभंग, भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे खळबळ

0

पुणे : एन पी न्यूज 24  – Pune Crime | फर्ग्युसन महाविद्यालय (Ferguson College) परिसरातील ‘हेअर स्पा’ मध्ये तरुणीचा विनयभंग केल्याची घटना ताजी असतानाच दुसऱ्या दिवशी पुण्यातील (Pune Crime) सदाशिव पेठेत (Sadashiv Peth) स्पर्धा परीक्षेच्या विद्यर्थीनीचा भररस्त्यात विनयभंग (Molestation) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना सोमवारी (दि.10) सकाळी अकराच्या सुमारास शास्त्री रोड (Shastri Road) परिसरात घडली. याप्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात (Vishrambag Police Station) गुन्हा (FIR) दाखल केला आहे.

याबाबत नवी पेठत राहणाऱ्या 25 वर्षीय तरुणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यावरुन अनोळखी व्यक्तीविरुद्ध विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी ही सदाशिव पेठेत स्पर्धा परीक्षेचा अभ्यास (Competitive Exam Study) करते. सोमवारी सकाळी नेहमीप्रमाणे मैत्रिणीसोबत शास्त्री रस्त्यावरुन टिळक रोडने (Tilak Road) जात होती. त्यावेळी चिंतामणी इमारतीसमोर अचानक एका तरुणाने अश्लील चाळे (Pornography) करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांच्याकडे पाहून अश्लिल बोलण्यास सुरुवात केली. यामुळे घाबरलेल्या तरुणीने थेट पोलीस ठाण्यात धाव घेत अनोळखी तरुणाविरुद्ध तक्रार दाखल केली. (Pune Crime)

शहरात सलग दुसऱ्या दिवशी तरुणीचा भररस्त्यात विनयभंग केल्याची घटना घडली आहे.
त्यामुळे पुणे शहरातील महिलांच्या सुरक्षिततेचा (Women Security) प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पुण्यात महिलांच्या विनयभंगाच्या घटना घडत असल्याने तरुणींकडून संताप व्यक्त केला जात आहे.
पोलिसांनी अशा विकृत व्यक्तींवर कडक कारवाई करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे.

 

 

Web Title : – Pune Crime | student molested all day on shastri road in pune vishrambaug police station

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pimpri Corona Updates | पिंपरी चिंचवडमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या 8 हजारांवर, गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 1706 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Railway Protection Force (RPF) | रेल्वे सुरक्षा दलात (RPF) भरतीची जाहिरात बोगस, विश्वास न ठेवण्याचे रेल्वे प्रशासनाकडून आवाहन

Pune Corona Updates | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 3459 नवीन रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

EPFO Update | जर केले नाही ईपीएफ खात्याशी संबंधीत ‘हे’ काम तर तुम्ही पाहू शकणार नाही अकाऊंट पासबुकच्या डिटेल

Confirmed Railway Ticket | खुशखबर ! आता पोस्ट ऑफिसमध्ये मिळेल ट्रेनचे कन्फर्म तिकिट, जाणून घ्या पद्धत

Leave A Reply

Your email address will not be published.