Supriya Sule On Ajit Pawar | अजित पवार कणखर नेते राहिले नाहीत, आता त्यांचे भाषण ऐकले की आश्चर्य वाटते, सुप्रिया सुळेंची टीका

0

पुणे : Supriya Sule On Ajit Pawar | बारामती लोकसभा मतदारसंघातील (Baramati Lok Sabha) महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवार सुप्रिया सुळे सध्या पुण्यातील खडकवासला मतदारसंघात (Khadakwasla Vidhan Sabha) प्रचार करत आहेत. आज प्रचारादरम्यान त्यांनी पत्रकारांशी बोलताना पुन्हा एकदा अजित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडले. कणखर नेते म्हणून राज्याला परिचित असलेले अजित पवार आता पूर्वीसारखे राहिले नाहीत, असे सुळे म्हणाल्या.

अजित पवार यांच्यावर निशाणा साधताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, अजित पवारांकडे संपूर्ण राज्य कणखर नेता आणि विरोधी पक्षनेता म्हणून पाहत होते. आता जे अजित पवार दिसत आहेत ते अजित पवार नाहीत. आताच्या अजित पवारांचे भाषण ऐकले की आश्चर्य वाटते.

महायुतीवर टीका करताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, महायुतीच्या सगळ्या नेत्यांना मिळून पवार साहेबांना (Sharad Pawar) संपवायचा आहे. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी बारामतीत तसे बोलून दाखवले होते. हे सगळे पवार साहेबांना संपवण्यासाठी षडयंत्र सुरु आहे. महायुतीकडून जी कृती केली जात आहे, त्यावरून समजते की त्यांना शरद पवारांना त्रास द्यायचा आहे. शरद पवारांना संपवायचे आहे. हाच अजेंडा घेऊन विरोधक कामाला लागले आहेत.

माझ्या बायकोला निवडून द्या सगळी कामे करतो, अशी वक्तव्य अजित पवार सातत्याने करत आहेत, यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, कदाचित बहिणीचे प्रेम कमी पडले असेल. दुर्दैव आहे की सगळेच नात्यांमध्ये अडकले आहेत. मी पहिला देश, मग राज्य, मग पक्ष, मग नाती पाहते.

त्या पुढे म्हणाल्या, मी नात्यांसाठी राजकारणात आले नाही तर मायबाप जनतेची सेवा करण्यासाठी आहे. दादा असे बोलतात याचे मला आश्चर्य वाटते. आमच्याशी घटस्फोट होऊन सात महिने झाले. अठरा वर्ष एका संघटनेत आम्ही काम केले आहे.

नागरिकांच्या समस्यांबाबत सुप्रिया सुळे म्हणाल्या, जेव्हा पासून खासदार आहे तेव्हापासून प्रत्येक मतदारसंघात मी दौरे करत आहे. पुण्यासह राज्यात पाण्याचा प्रश्न गंभीर आहे. पुणे पालिकेच्या निष्क्रिय कामामुळे पुण्यातील पाणी, कचरा, वाहतुक प्रश्न सुटलेला नाही. भाजपची एक हाती सत्ता असूनही काम नाही, हे त्यांचे अपयश आहे, असे त्या म्हणाल्या.

Leave A Reply

Your email address will not be published.